‘बेबी डॉल’ सनीनं शेअर केला ब्लॅक स्विम सूटमधील फोटो, काही तासातच मिळाले 10 लाख Likes !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडची बोल्ड अँड ब्युटीफुल अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी गेल्या काही दिवसांपासून सनी आपल्या हॉट फोटोंमुळं चर्चेत येताना दिसत आहेत. हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करण्याचा जणू तिनं सपाटाचं लावला आहे. खास बात अशी की, सनीनं फक्त फोटो शेअर करायचा उशीर असतो की, लगेच तो व्हायरल होताना दिसत असतो. पुन्हा एकदा सनीनं तिच्या हॉटनेसनं साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

सनीनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात ती नेहमीप्रमाणे बोल्ड आणि हॉट पोज देताना दिसत आहे. फोटोत दिसत आहे की, सनीनं ब्लॅक स्विमसूट घातला आहे. सनीसोबत तिची एक मैत्रीणही दिसत आहे. तिचं नाव आहे नुरिया कॉनट्रेरास जिल भेटून सनी खूप आनंदीत झाली आहे. सनी तिला धन्यवादही देत आहे.

सनीनं शेअर केलेला हा फोटो पाहता पाहता सोशलवर व्हायरल झाला. काही तासातच या फोटोला कोट्यावधी लोकांनी लाईक केलं आहे. अजूनही हा वेगानं व्हायरल होत आहे.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती. सनी सध्या 2 टीव्ही शो करत आहे. तिच्याकडे एक हिंदी आणि एक साऊथचा सिनेमा आहे जो तिच्या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. सनी सिटी मीडिया अँड एंटरटेंमेंट असं या प्रॉडक्शन हाऊसचं नाव आहे. परंतु सध्या लॉकडाऊन असल्यानं सारं काही ठप्प आहे.