‘बेबी डॉल’ सनीच्या पाठीची ‘स्कीन’ कशी निघाली ? अभिनेत्रीला झाली इजा ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनीचा एक व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओत दिसत आहे की, सनी लिओनीच्या पाठीची स्किन निघत आहे. हे पाहून सारेच अवाक् झाले आहेत. व्हिडीओत दिसत आहे की, सनीची मेकअप आर्टीस्ट तिच्या पाठीवर आर्टीफिशियल स्कीन लावत आहे. सनीनं एका फोटोशुटसाठी हा खटाटोप केला होता. जनावरांना नुकसान पोहचू नका असा संदेश सनी देत आहे.

सनीनं व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, “एवढे सारे आणि सुंदर विगन शुज, बॅग आणि जॅकेट असतानाही पर्यावरणाची हानी करत एखादी गोष्ट घालण्सााठी जनावरांची हत्या करण्याची गरज नाही.” सनीच्या व्हिडीओनंतर अनेकांनी तिच्या हेतूचं कौतुक केलं आहे. सनीच्या अनेक चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनीही सनीच्या या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिनं हे शुट पेटा इंडियाच्या कॅम्पेनसाठी केलं आहे.

सनीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकतीच तिची रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 ही वेब सीरीज अल्ट बालाजी आणि ZEE5 वर रिलीज झाली होती. सनी सध्या 2 टीव्ही शो करत आहे. तिच्याकडे एक हिंदी आणि एक साऊथचा सिनेमा आहे जो तिच्या प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे. सनी सिटी मीडिया अँड एंटरटेंमेंट असं या प्रॉडक्शन हाऊसचं नाव आहे.

View this post on Instagram

🔥🔥💥

A post shared by Sunny Sunny (@sunnyhot.sexy) on

View this post on Instagram

😍😍

A post shared by Sunny Sunny (@sunnyhot.sexy) on

 

You might also like