सुशांतच्या निधनानंतर ‘नेपोटीजम’वरून वाद सुरू असतानाच बॉलिवूड डेब्युसाठी तयार ‘हे’ 7 स्टार किड्स !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाहीचा मुद्दा जोरावर आहे. करण जोहरसह अनेक स्टार किड लोकांच्या निशाण्यावर आहेत. यात आलिया भट, सोनाक्षी सिन्हा असे अनेक स्टार किड आहेत. अशात असेही काही स्टार किड रांगेत आहेत जे आता बॉलिवूड डेब्युसाठी तयार आहेत.

1) अहान शेट्टी – सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी याला प्रोड्युसर साजिद नाडियाडवाला लाँच करत आहे. तेलगू हिट सिनेमा आरएक्स 100 च्या हिंदी रिेमेकनं अहान करिअरला सुरुवात करणार आहे.

View this post on Instagram

In the making

A post shared by Ahan Shetty (@ahan.shetty) on

2) इब्राहिम अली खान – अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांचा मुलगा इब्राहिम अली खान याची डेब्यूसाठी तयारी सुरू आहे. अद्याप या बाबत माहिती समोर आलेली नाही. पंरतु सैफनं एकदा एका मुलाखतीत बोलताना याबद्दल संकेत दिले आहेत.

3) सुहाना खान – बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि गौरी खान यांची लाडकी सुहाना खानही डेब्युसाठी तयार आहे. द ग्रे पार्ट ऑफ ब्लू या शॉर्ट फिल्ममध्ये तिनं काम केलं आहे. ही फिल्म तिच्या क्लासमेटनं डायेरक्ट केली होती.

View this post on Instagram

my mum took these 😋 @gaurikhan

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2) on

4) शनाया कपूर – अनिल कपूरचा लहान भाऊ संजय कपूर आणि महीप कपूरची मुलगी शनाया आता कधीही पडद्यावर दिसू शकते. जान्हवी कपूरच्या गुंजन सक्सेनामध्ये तिनं असिस्टंट म्हणून काम केलं आहे. गेल्या वर्षी पॅरीसच्या Le Bals Des Debutantes मध्ये तिनं भाग घेतला होता.

5) इरा खान – आमिर खान आणि रीना दत्ता यांची मुलगी इरा खान हिनं डायरेक्शनमध्ये पदार्पण केलं आहे. इरानं ‘युरीपाईड्स मेडिया’ (‘Euripides Medea’) हे नाटक डायरेक्ट केलं आहे. या नाटकातून सिक्सर किंग युवराजची पत्नी हेजल किच हिनं अभिनय क्षेत्रात कमबॅक केलं आहे. यात तिची प्रमुख भूमिका आहे. इराही डेब्युसाठी रेडी आहे. परंतु ती पडद्यावर किंवा त्यामागे दिसेल अशी पक्की माहिती समोर आलेली नाही.

6) यशवर्धन आहुजा – एका इंग्रजी वृत्तापत्रात अशी माहिती समोर आली होती की, अभिनेता गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा साजिद नाडियाडवालाच्या मार्केटींग टीममध्ये काम करत आहे. यातून त्याला सिनेमाचे बारकावे शिकायचे होते. वडिलांप्रमाणेच त्याला कॉमिक सिनेमात काम करायचं आहे.

View this post on Instagram

Happy #diwali 💥

A post shared by Yashvardhan Ahuja (@ahuja_yashvardhan) on

7) अलिजेह अग्निहोत्री – सलमान खानची बहिण अलवीरा आणि अतुल अग्निहोत्री यांची मुलगी अलिजेह अग्निहोत्री ही देखील आगामी काळात मोठ्या पडद्यावर दिसू शकते. परंतु यासंदर्भात अद्याप कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like