SSR Death Case : ‘जस्टिस फॉर सुशांत’ कुठं गेलं ? ही लढाई आता जस्टिस फॉर कंगना आणि रवि किशन झाली आहे का ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिवंगत बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यास सोशल मीडियाद्वारे न्याय देण्याची मागणी केली जात होती, ज्यास अनेक बॉलीवुड सेलिब्रिटीजचा सुद्धा सपोर्ट मिळाला. मात्र, मागील काही दिवसांपासून असे जाणवत आहे की, या प्रकरणाला अनेक मार्ग फुटले आहेत आणि नको त्या आरोप प्रत्यारोपामुळे मुळ मुद्दा बाजूला पडला आहे.

रवि किशन विरूद्ध जया बच्चन
संसदेत रवि किशन विरूद्ध खासदार जया बच्चन असा सामना सुरू झाला होता. या दोघांमधील वादाचे पडसाद अजूनही उमटतच आहेत. हा वाद आता अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर सुरक्षा वाढवण्यापर्यंत वळणावर सध्या पोहचला आहे. मात्र, सुशांतचा मुळ मुद्दा बाजूला जाऊन वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

कंगना, राऊत आणि उर्मिला मातोंडकर
कंगना राणावत आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये सुशांत केसवरून मोठी खडजंगी झाली. हे प्रकरण देशाचे संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे राज्यपाल असा प्रवास करत व्हाया कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा मिळेपर्यंत गेले. आता जया बच्चन यांच्या समर्थनासाठी अ‍ॅक्ट्रेस उर्मिला मातोंडकर उतरली असून आता या दोन्ही अभिनेत्रींमध्ये सामना रंगला आहे.

मागे पडली सुशांतला न्याय देण्याची मोहिम
दरम्यान, अ‍ॅक्ट्रेस काम्या पंजाबीने सुशांत सिंह राजपूतला न्याय देण्याच्या या माहिमेबाबत ट्विट करून म्हटले आहे की, हे सर्वकाही जस्टिस फॉर सुशांत सिंह राजपूतपासून सुरू झाले होते आणि नंतर हे जस्टिस फॉर कंगना… आता जस्टिस फॉर रवि किशन झाले आहे. उद्या कुणी आणखी असेल. परवा तिसरा आणि नंतर आणखी कुणी…या सर्वामध्ये सुशांत कुठे आहे? करण जोहरसोबत भांडण कुणी केले, कुणी हे ड्रग्ज वैगरे केले आणि कुणाला वाय सिक्युरिटी सुरक्षा मिळत आहे, या सर्वामध्ये सुशांत सिंह राजपूत कुठे आहे? विचार करा, विचार करा.

काही दिवसांपासून काम्या पंजाबी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे आणि सतत सुशांत सिंह राजपूतच्या केसवरून ट्विट करत आहे. नुकतेच तिने जया बच्चन यांच्या भाषणाचे समर्थन केले होते आणि कंगनाच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता.

काम्याने जया बच्चन यांच्या समर्थनात म्हटले होते की, टीव्ही इंडस्ट्रीचा भाग असल्याच्या नात्याने मला वाटते की, सुशांत आमच्यातीलच एक होता आणि आम्हाला हे जाणून घेण्याचा अधिकार आहे की, अखेर 14 जूनला काय झाले होते. माझी बाजू स्पष्ट आहे. फिल्म इंडस्ट्री आणि येथील लोकांना शिव्या देणे माझ्यासाठी चुकीचे आहे. लोकांचे लक्ष पूर्णपणे विचलित होत आहे आणि मी या सर्कसचा भाग होणार नाही. तुम्ही खुप प्रेम जयाजी.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like