सुशांत सिंह राजपूत सुसाईड केस : सुशांतच्या आत्महत्येच्या CBI चौकशीसाठी ‘या’ भाजप खासदाराचं थेट PM मोदींना पत्र !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिना झाला आहे. अजूनही त्याच्या निधनाबद्दल असणाऱ्या निरनिराळ्या चर्चा सुरू आहेत. काही लोक आहेत जे या घटनेला आत्महत्या मानायला तयारच नाहीत. अनेक लोक असे आहेत जे अद्यापही CBI चौकशीची मागणी करत आहेत. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींचाही यात समावेश आहे. आता राजकीय लोकही या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करताना दिसत आहेत. राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच या प्रकरणी पत्र लिहिलं आहे. माजी खासदार पप्पू यादव यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिलं आहे.

अभिनेता शेखर सुमननं दोन्ही पत्र सोशलवर शेअर केले आहेत. सुब्रण्यम स्वामींनी लिहिलं की, “माझे असोसिएट इन लॉ ईशकरण भंडारी यांनी सुशांत सिंह राजपूतच्या कथित सुसाईडवर काही रिसर्च केला आहे. मी माझ्या मुंबईतील सूत्रांकडून ऐकलं आहे की, बॉलिवूडमधील अनेक मोठी नावं ज्यांचा दुबईतील डॉनसोबत संबंध आहे ते पोलीस तपासाच्या माध्यमातून कवरअप करू इच्छित आहेत. जेणेकरून आपल्या मर्जीनं केलेली ही आत्महत्या आहे असं सिद्ध करता यावं.”

आपल्या पत्रात स्वामी पुढे म्हणाले, “मी अशी मागणी करत आहे की, मुंबई पोलिसांनी याची निपक्षपणे याचा तपास करावा. माझी तुम्हाला विनंती आहे की, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा राज्यपाल याच्या द्वारे सीबीआय चौकशीसाठी समहत करू शकता.”