SSR Death Case : ‘रिया चक्रावर्ती आदित्य ठाकरेंना कधीच भेटली नाही’, अभिनेत्रीच्या वकिलांचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  14 जूनला सुशांत सिंह राजपुतने त्यांच्या बांद्रा येथील राहत्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. त्या प्रकरणावर आधारित अनेक चर्चांना उधाण आलं आहे. सुशांत सिंहचे वडील केके सिंह यांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रावर्तीवर सुशांतच्या खुनाचा आरोप केला आहे. त्यावर खुलासा देताना रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी खुलासा केला आहे. त्यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि रियाच्या भेटीच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे.

न्युज एजेंसी एनएनआय च्या अनुसार त्यांची त्यांचे ऑफिशियल स्टेटमेंट दिले आहेत. ते म्हणाले, रियाला याबद्दल काहीच माहीत नाही आणि ती आत्तापर्यंत कधीच आदित्य ठाकरे यांना भेटली नाही. ती कधीच त्यांच्याशी फोनवर बोलली नाही. ती आदित्य ठाकरेंना फक्त एक नेता म्हणून पाहते. ती डिनो मोरियाला ओळखते, आणि भेटली सुद्धा आहे.

तसेच रियाच्या वकिलाने बिहार पोलिसांवर देखील प्रश्न उपस्थित केला. बिहार पोलिसांनी हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. रिया आशा खोट्या आरोपांमुळे झुकणार नाही ती तिच्या मतांवर ठाम आहे. या प्रकरणात राजनीती होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

बिहार सरकारच्या शिफारशीनंतर केंद्राने हे प्रकरण आता सीबीआय कडे दिले असून, रिया याला विरोध करत आहे. ईडी देखील तपासणी करत आहे. सोशल मीडियावर मात्र रोज नवनवीन वाद सुरू आहेत