सुशांत सिंह राजपूत सुसाईड केस : CBI चौकशीच्या मागणीदरम्यान अभिनेता शेखर सुमननं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागितली Appointment !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतचं निधन होऊन जवळपास 3 आठवडे होऊन गेले आहेत. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. चाहते तर अजूनही सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. अशातच आता अभिनेता शेखर सुमन यानं या प्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे. अद्याप त्यांना अपॉईंटमेंट मिळालेली नाही.

शेखरनं ट्विट करत यासंर्भात माहिती दिली आहे. शेखरनं लिहिलं की, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. दोन दिसवांपासून वाट पहात आहे. आतापर्यंत काहीच उत्तर मिळालेलं नाही.”

शेखरच्या या ट्विटनंतर एका युजरनं त्याला कायदेमंत्री रवि शांकर प्रसाद यांना भेटून सीबीआय चौकशीची विनंती करण्याचा सल्ला दिला आहे. शेखरनं यावर उत्तर देत सांगितलं की, तो त्यांनाही भेटण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु कोरोनामुळं अडचण येत आहे.

शेखर सुमननं सुशांतच्या पटण्यातील घरी जाऊन कुटुंबाची भेट घेतली होती. तिथं त्यानं पत्रकार परिषद घेत सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. यात जवळपास 30 लोकांचा समावेश आहे ज्यात त्याचे नोकर, कुटुंबीय, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, मित्र सिद्धार्थी पिटानी, सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचे डायरेक्टर मुकेश छाबडा, सुशांतचा आगामी सिनेमा दिल बेचारा मधील त्याची कोस्टार संजना संघी यांचा समावेश आहे. अलीकडेच पोलिसांनी बॉलिवूड डायरेक्टर संजय लीली भन्साळी यांचीही चौकशी केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like