Sushant Singh Rajput Death: Ex गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे आणि सुशांतबद्दल त्याच्या डॉक्टरांचा मोठा ‘खुलासा’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत आत्महत्या केस प्रकरणी मुंबई पोलीस आता सुशांतच्या जवळच्या लोकांची चौकशी करत आहेत. डायरेक्टर मुकेश छाबडानंतर आता पोलिसांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला गुरुवारी (दि 18 जून) बांद्र्याच्या पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. इतकंच नाही तर आता पोलिसांनी सुशांतचे मानसशास्त्रज्ञ केसरी चावडा यांचाही जबाब नोंदवला आहे. त्यांनी खुलासा केला आहे की, सुशांत एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोकंडेला मिस करत होता. तिच्यासोबत ब्रेकअप केल्याचा त्याला पस्तावा होत होता.

सुशांतच्या डॉक्टरांनी सुशांतचं मानसिक आरोग्य आणि एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेबद्दल अनेक चकित करणारे खुलासे केले आहेत. एका इंग्रजी वृत्तानुसार अंकितासोबत नातं तोडल्याचा त्याला पस्तावा आला होता.

असंही सांगितलं जात आहे की, गेल्या सहा महिन्यात सुशांत तीन वेळा डॉक्टरांकडे गेला होता. रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, डॉक्टरांनी असाही खुलासा केला आहे की, गेल्या एका वर्षापासून तो डिप्रेशनमध्ये होता. डिप्रेशनमुळं त्याला रात्री झोपही येत नसे. अंकितासोबतच्या ब्रेकअपनंतर काही काळ सर्व काही ठिक होतं. परंतु नंतरच्या अयशस्वी नात्यांनी त्याला अशी जाणीव करून दिली की, कोणी त्याला पसंत करत नाही. असंही सांगितलं जात आहे की, डॉक्टरांनी कृती सेनन आणि एका डायरेक्टरच्या मुलीचा उल्लेख केला आहे ज्यांच्यासोबत सुंशांतचं नातं होतं. त्याचे हे दोन्ही नाते अयशस्वी राहिले आहेत.

डॉक्टरांनी सांगितलेला एक मुद्दा असाही होता की, सुशांत एकाच गोष्टीबद्दल वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करत असे.