सुशांतच्या आठवणीत अभिनेत्री भूमी पेडणेकर करणार ‘हे’ चांगलं काम, पोस्ट शेअर करत सांगितलं !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत जाऊन आता 15 दिवस झाले आहेत. तरीही त्याची आठवण काढणं सुरूच आहे. बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिनं सुशांतच्या आठवणीत एक चांगलं काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशलवर पोस्ट शेअर करत तिनं याबद्दल माहिती दिली आहे.

भूमीनं तिच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात, ती 550 कुटुंबाना जेवण देणार आहे असं तिनं सांगितलं आहे. भूमीनं यासाठी एक साथ फाऊंडेशन या एनजीओसोबत हात मिळवणी केली आहे. पोस्टमध्ये भूमी म्हणते की, “मी एक साथ फाऊंडेशनद्वारे 550 गरजू कुटुंबाना जेवण देण्याची शपथ घेते. या गरजूंच्य मदतीसाठी हात देऊयात. या काळात याची खूप गरज आहे.”

View this post on Instagram

🙏 . . . @eksaathfoundation

A post shared by Bhumi✨ (@bhumipednekar) on

भूमीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती पती पत्नी और वो या सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिच्यासोबत कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होते. प्रेक्षकांचाही सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. भूमीनं भूत सिनेमातही काम केलं आहे. लवकरच ती दुर्गावती या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय भूमी तख्त या सिनेमातही दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like