SSR Case : सुशांत आणि अंकिता लोखंडे यांचे WhatsApp चॅट ED नं चौकशीसाठी केली जप्त

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरू आहे. माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुशांत आणि त्याची माजी प्रेयसी अंकिता लोखंडे यांची व्हॉट्सअ‍ॅप चॅट ताब्यात घेतली आहे.सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईच्या वांद्रे येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये मृत अवस्थेत आढळला. त्याच्या अश्या अकाली निधनाने सर्वांनाच धक्का बसला. गेल्या काही दिवसांत सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणात अनेक नवीन खुलासे झाले आहेत. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी दिवंगत मुलाची प्रेयसी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप करत बिहारमध्ये एफआयआर दाखल केला आहे आणि त्यानंतर कथा बदलली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सुशांतसिंह राजपूतचे सीए यांच्याकडून पैशाच्या घोटाळ्याच्याबाबत चौकशी केली आहे. या दरम्यान आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अंकिता लोखंडे आणि सुशांतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट ताब्यात घेतले आहे.

सोमवारी बिहार पोलिसांच्या पोलिस महासंचालकांनी पैशांच्या मनी ट्रेलविषयी बोलताना सांगितले की, सुशांतच्या बँक खात्यात गेल्या चार वर्षांत 50 कोटी रुपये जमा झाले होते, परंतु नंतर ते काढण्यात आले. आयएएनएसने म्हटले आहे की, ‘गेल्या चार वर्षात सुशांतसिंह राजपूतच्या बँक खात्यात जवळपास 50 कोटी रुपये जमा झाले परंतु आश्चर्य म्हणजे ते सर्व काढून घेण्यात आले. एका वर्षात त्याच्या खात्यात 17 कोटी जमा झाली, त्यापैकी 15 कोटी काढून घेण्यात आली. हा तपास करण्याचा महत्त्वाचा मुद्दा नाही का? आम्ही गप्प बसणार नाही. अशा घटनांचा तपास का केला गेला नाही असा सवाल आम्ही मुंबई पोलिसांना करू.

काही दिवसांपूर्वी सुशांतचे वडील के.के. सिंहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे, ज्यामध्ये ते म्हणाले की, फेब्रुवारीमध्ये सुशांतच्या जीवाला धोका निर्माण झाल्याबद्दल मुंबई पोलिस सतर्क झाले होते. त्यानंतर लवकरच सुशांतचा मेहुणा, हरियाणाचे आयपीएस अधिकारी ओ.पी. सिंग यांच्याकडून व्हॉट्सअ‍ॅप तक्रार शेअर केली गेली. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना वांद्रेचे माजी डीसीपी परमजीतसिंग दहिया म्हणाले की, त्यांना कधीही औपचारिक तक्रार मिळाली नाही आणि त्यांच्याकडे लेखी तक्रार मागितली गेली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like