‘माझा विश्वासच बसत नाही की तो आत्महत्या करू शकतो’, सुशांत सिंह राजपूतच्या डॉक्टरचं ‘विधान’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूला जवळपास दीड महिना उलटून गेला आहे परंतु अद्यापही भरपूर लोकांना यावर विश्वास ठेवणे कठीण होत आहे की सुशांत आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांनी आत्महत्या केली असावी. ही गोष्ट केवळ सर्वसामान्यांच्या मनात आहे असे नाही, परंतु सुशांतवर उपचार करणारे डॉक्टर रझी अहमद यांना देखील विश्वास बसत नाही की त्यांनी आत्महत्या केली असावी. डॉ. रझी यांनी झारखंडमध्ये ‘महेंद्रसिंग धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जेव्हा सुशांत यांना इन्फेक्शन झाले होते तेव्हा त्यांनी उपचार केले होते.

डॉ. रझी यांनी सांगितले की जेव्हा ते त्यांना भेटले तेव्हा कळले की ते किती जमिनीशी जोडले गेलेले व्यक्ती आहेत. कारण जेव्हा ते प्रथम भेटले, त्याआधी त्यांना एक प्रकारची भीती होती की एक मोठा स्टार आहे. पण भेटल्यावर त्यांनी डॉक्टरांचे चांगल्या पद्धतीने अभिवादन करत त्यांना पूर्णपणे उपचारासाठी सहकार्य केले.

एका वृत्तपत्राच्या फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात बोलताना डॉ. रझी म्हणाले की सुशांतच्या मृत्यूसंदर्भात ठोस पद्धतीने काही चौकशी झाली पाहिजे असे त्यांनाही वाटते. कारण सुशांतसारखा माणूस असे पाऊल उचलू शकतो यावर त्यांचाही विश्वास नाही. डॉ. रझी अहमद म्हणतात की कोरोना आणि लॉकडाऊनमुळे खरोखरच लोकांच्या मनात निराशेची भावना निर्माण झाली आहे. पण वास्तव तसे नाही. डॉ. रझी यांनी असेही सांगितले की जेव्हा एकदा सुशांतला काही लोक स्थानिक विषयांवर चित्रपट बनवण्यास सांगत होते, तेव्हा त्यांनी सांगितले की का नाही. त्यांना आवडेल.