पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्य निधनानंतर आता त्यची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे खूपच चर्चेत येताना दिसत आहे. जेव्हा सुशांत आणि अंकिता वेगळे झाले तेव्हा दोघांनाही यातून सावरायला वेळ लागला होता. ब्रेकअपनंतर अंकितानं करिअर सावरण्यासाठी स्वत:ला झोकून दिलं. परंतु तिच्या लुकमध्ये जे काही ट्रन्सफॉर्मेंशन झालं होतं ते खूप चर्चेत राहिलं होतं.

एकता कपूरच्या पवित्र रिश्ता मालिकेत साध्या लुकमध्ये दिसणाऱ्या अंकिताची हीच ओळख बनली होती. यानंतर ती एकदम बोल्ड आणि ग्लॅमरस लुकमध्ये दिसू लागली. तिच्या या बोल्ड फोटोशुटची खूप चर्चा झाली जे लोकांना खूप आवडलंही होतं. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये अंकितानं लिहिलं होतं की, New Me.

अंकितानं तिची सिंपल मुलीची इमेज तोडण्यासाठी अनेक बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशुट केले. तिचे आधीचे फोटो आणि आताचे फोटो यात खूप फरक आहे. अंकिता पूर्णपणे बॉलिवूडच्या रंगात रंगली होती.

अंकिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पवित्र रिश्ता या मालिकेव्यतिरीक्त तिनं सिनेमातही काम केलं आहे. कंगना रणौतच्या मणिकर्णिका या सिनेमात तिनं महत्त्वाची भूमिका साकारली आहे. टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमातही तिनं काम केलं आहे.