#BoycottKhans : ट्विटरवर ‘खान्स’ला बॉयकॉट करण्याची जोरदार मागणी, सुशांतचे भडकलेले चाहते करतायेत ‘असे’ Tweets !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर आता सोशलवर इनसाईडर्स-आउटसईडर्स, नेपोटीजम अशी अनेक मुद्द्यावर चर्चा रंगली आहे आणि वादही होत आहे.

इतकंच नाही तर लोकांनी अनेक स्टार्सला नेपोटीजमच्या नावाखाली टारगेट केलंय. सुशांत आऊटसाईडर्स असल्यानं अनेकांनी त्याला नाकारलं असंही बोललं जात आहे. सुशांत जाऊन 1 आठवड झाला आहे तरीही लोकांचा संताप शांत होत नाहीये. ट्विटरवर सतत काही ना काही ट्रेंड सुरूच आहे.

सध्या ट्विटरवर #BoycottKhans हा हॅशटॅग ट्रेंड करताना दिसत आहेय. या हॅशटॅगच्या माध्यमातून लोक सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान अशा तीनही खानवर आपला राग काढत आहेत. लोक केवळ रागच व्यक्त नाही करत आहेत तर ते त्यांचे सिनेमे बॉयकॉट करण्याबद्दलही आग्रही आहेत. अनेकजण आता #BoycottKhans हा हॅशटॅग वापरून ट्विट करताना दिसत आहेत.