सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी वडिलांनी रिया चक्रवर्तीच्या विरूध्द पटण्यात दिली FIR, शेखर सुमन म्हणाला – ‘Good News’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतचे वडिल के के सिंह यांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती विरोधात एफआयआर दिली आहे. पटण्याच्या राजीव नगर पोलीस ठाण्यात ही एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

केके सिंह यांनी आरोप केला आहे की, रियानं सुशांतकडून पैसे घेतले आणि त्याला सुसाईडसाठी उकसवलं आहे. आयपीसी मधील कलम 341, 342, 380, 406, 420, 306 अंतर्गत ही केस दाखल करण्यात आली आहे.

पटणा सेंट्रल झोनचे इंस्पेक्टर संजय सिंह यांनी एएनआयला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की, “सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केली आहे. रियाविरोधात अनेक आरोपांखाली केस दाखल करण्यात आली आहे. ज्यात सुशांतला आपल्या प्रेमात फसवून पैसे उकळणं आणि आत्महत्येसाठी उकसवणं अशा आरोपांचाही समावेश आहे.

इंस्पेक्टरनं सांगितल्यानुसार, सुशांतच्या प्रकरणाचा तपास करण्याासाठी 4 पोलिसांची टीम मुंबईत दाखल झाली आहे. या केससंबंधातील सर्व कागदपत्र ते पोलिसांकडून कलेक्ट करतील. पटणा पोलिसांच्या टीममध्ये इनवेस्टीगेशन ऑफिसर सोबत इंस्पेक्टर मो. कैसर आलम, मनोरंजन भारती आणि इतर एका इंस्पेक्टरचा समावेश आहे.

ही सगळी माहिती समोर आल्यानंतर सोशलवर सक्रिय असणारा आणि गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणारा अभिनेता शेखर सुमन यानं ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. शेखरनं लिहिलं की, एक चांगली बातमी समोर आली आहे. सुशांतच्या कुटुंबीयांनी एफआयआर दाखल केल्यानंतर पटणा पोलीस आता मुंबईत आले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.