सुशांतसाठी अंकिता तिच्या करिअरला करणार होती Good Bye ! आता झाला खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतचा मित्र निर्माता संदीप सिंह यानं असा दावा केलाय की, सुशांतची एक्स प्रेयसी अंकिता लोखंडे हिनं सुशांतसाठी तिचं करिअर जवळपास सोडलं होतं. संदीपनं असंही सांगितलं की, सुशांतच्या रिया चक्रवर्तीसोबतच्या लग्नाबद्दलही त्याला काही कल्पना नव्हती. एका मुलाखतीत बोलताना संदीप म्हणाला, “आम्ही कॉल आणि मेसेजच्या माध्यमातून संपर्कात होतो. मला नाही वाटत की, कोणी आपल्या मनातील गोष्टी तेव्हा सांगतं जेव्हा ते असं काही करणार असतं. याशिवाय त्याच्या घरीही अनके लोकं होती.”

‘मला रिया आणि सुशांतच्या लग्नाबद्दल काहीच माहित नव्हतं’
संदीप पुढे म्हणाला, “मला रिया चक्रवर्ती आणि सुशांतच्या लग्नाबद्दल काहीच माहित नव्हतं. मला खरंच काही माहित नव्हतं. मला एवढं माहित आहे की एकेकाळी अंकिता आणि सुशांत लग्न करणार होते. माझ्यासाठी तर त्याचं शेवटचं रिलेशनशिप तेच होतं. मला त्याच आठवणींसोबत रहायचं आहे.

अंकिताबद्दल बोलताना संदीप म्हणतो…
अंकिताबद्दल बोलताना संदीप म्हणतो, “अंकिता केवळ त्याची प्रेमिक नव्हती तर तिनं त्याच्या आयुष्यात आईचं स्थान घेतलं होतं. माझ्या इंडस्ट्रीतील 20 वर्षांच्या प्रवासात मी अंकितासारखी मुलगी पाहिली नाही. तिनं ज्या पद्धतीनं त्याची काळजी घेतली आहे, केवळ तीच होती जी त्याला वाचवू शकत होती.”

‘अंकिता सारं काही सुशांतच्या आवडीनुसार करत होती’
पुढे अंकिताबद्दल सांगताना संदीप म्हणाला, “अंकिता त्याच्यासाठी सारं काही योग्य प्रकारे करत होती. सुशांतच्या पसंतीनंच ती तयार होत असे. जेवण, घरातील इंटेरियर, घरातील पुस्तकं जे काही आहे ते सर्वकाही सुशांतला हवं तसं आणि त्याच्या आवडीनुसार तिनं केलं होतं. सर्वकाही त्याच्या आवडीनुसार होत असे. वास्तविक पाहता मला तर असं वाटतं की, सर्वांना अंकितासारखी मुलगी मिळावी.