सुशांतची गर्लफ्रेड रिया चक्रवर्तीला मिळाली ‘बलात्कार’ अन् खूनाची धमकी, ‘स्क्रीनशॉट’ शेअर करत व्यक्त केला अभिनेत्रीनं संताप

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतचं निधन होऊन आज एक महिना झाला आहे. असं असलं तरी आजही चाहत्यांचा राग काही केल्या कमी होत नाही. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती अजूनही लोकांच्या निशाण्यावर आहे. अलीकडेच रियाला एका महिला युजरनं रेपची आणि मर्डरची धमकी दिली आहे. रियानं याचा स्क्रीनशॉट शेअर जोरदार प्रत्युत्तर देत राग व्यक्त केला आहे. याशिवाय रियानं या तिच्या पोस्टमध्ये सायबर पोलिसांनाही टॅग केलं आहे.

रियानं इंस्टावरून एक मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यात मन्नु राऊत नावाची एक महिला युजर रियाला अश्लील भाषेत धमकी देताना दिसत आहे. युजरनं लिहिलं की, “मला खात्री आहे की, तुझा रेप होईल आणि खून केला जाईल. नाही तर तू आत्महत्या करशील. मी लवकरच काही लोकांना पाठवणार आहे जे तुझा खून करतील.”

https://www.instagram.com/p/CCsVR4vH2TV/

हा मेसेज पाहून रिया खूपच संतापली. तिनं स्क्रीनशॉट शेअर करत लिहिलं की, “मला लालची म्हटलं गेलं, मी शांत राहिले. मला खुनी म्हटलं गेलं, मी शांत राहिले. मला बेशरम म्हटलं गेलं, मी शांत राहिले. परंतु मी शांत आहे तर तुम्हाला हे म्हणण्याचा अजिबात अधिकार नाही की, माझा रेप किंवा मर्डर होईल. मी शांत आहे तर तुम्ही माझा रेप किंवा मर्डर करवून घेणार का. तुला कळतंय का तू काय बोलत आहेस आणि तुला परिस्थितीचं भान आहे का. हा एक गुन्हा आहे. कोणीच अशा प्रकारचा छळ सहन करता कामा नये.” रियानं या पोस्टमध्ये सायबर पोलिसांना टॅग करत कारवाई करण्याची मागणी केली आहे.