सुशांत सिंह राजपूतच्या घरात गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनं शुट केला होता ‘हा’ व्हिडीओ, सोशलवर होतोय प्रचंड व्हायरल ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्ती सतत चर्चेत येताना दिसत आहे. रिलेशनशिपमुळंही दोघांची खूप चर्चा झाली होती. नुकताच (बुधवार दि 1 जुलै 2020) रियाचा 28 वा वाढदिवसही झाला आहे. रियाचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहे. या व्हिडीओचं कनेक्शन सुशांत सोबत आहे.

सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती एकमेकांच्या खूप क्लोज होते. लॉकडाऊनमध्ये रियानं सुशांतच्या घरी असताना अनेक व्हिडीओ बनवले होते. व्हायरल व्हिडीओत रिया डबल रोलमध्ये दिसत आहे. तुम्ही जर व्हिडीओचं लोकेशन नीट पाहिलं तर लक्षात येईल की, हे सुशांतचं घर आहे.

रियानं हा व्हिडीओ तिच्या इंस्टावरून शेअर केला होता. रियानं व्हिडीओ शेअर करताना या व्हिडीओचं क्रेडिट सिद्धार्थ पिटानी याला दिलं होतं. सिद्धार्थ हा सुशांतचा खूप चांगला मित्र आहे. रियाचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर चर्चेत आहे.

रियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती चेहरे सिनेमात दिसणार आहे. चेहरे सिनेमात ती बिग बी अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी अशा मोठ्या कलाकारांसोबत दिसणार आहे. याच सिनेमात क्रिस्टलही डिसूजाही दिसणार आहे. तसं पाहिलं तर तिचं करिअर काही खास नाही चाललं. मेरे डैड की मारुति, सोनाली केबल, जलेबी अशा सिनेमात लिड रोल करूनही रिया बॉलिवूडध्ये आपलं स्थान तयार करण्यासाठी झटत आहे.

 

 

 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like