सुशांत सिंह राजपूत अनंतात विलीन ! साश्रू नयनांनी कुटुंबीयांनी दिला अखरेचा निरोप (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. आज सुशांतच्या पार्थिवावर अंत्य संस्कार करण्यात आले. मुलाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी सुशांतचे वडिल आणि कुटुंबातील इतर सदस्य दुपारी मुंबईत पोहोचले होते. व्हिले पार्लेमधील पवन हंस स्मशान भूमीत सुशांतला अंतिम निरोप देण्यात आला.

कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळं सुशांतच्या अंतिम संस्कारात जास्त लोक सहभागी होऊ शकले नाहीत. सुशांतचे वडिल आणि इतर काही जवळची लोकंच यावेळी उपस्थित होती. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. इंथच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. अखेर आज सुशांत अनंतात विलीन झाला आहे.

बिहारचा रहिवाशी सुशांत सिंह राजपूत त्या स्टार्सपैकी होता ज्यांनी प्रचंड मेहनत करत स्वत:च्या जीवावर यश मिळवलं होतं. त्याचं यश हे एका रात्रीत मिळालेलं यश नव्हतं. सुशांतचा ड्राईव्ह हाशेवटचा सिनेमा होता. हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज न झाल्यानंही तो नाराज होता अशी माहिती आहे.