home page top 1

….म्हणून अभिनेता सुशांत सिंहने सारा अली खानसोबत काम करण्यास दिला नकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानसोबत काम करण्यास नकार दिला आहे. सारा अली खानने सुशांतसिंग राजपूतसोबत चित्रपट ‘केदारनाथ’ मध्ये काम केले होते. त्यावेळी यांच्या नात्याची देखील चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. यानंतर आई अमृता सिंहच्या सांगण्यावरुन सारा सुशांतपासून लांब गेली. यानंतर, सारा आणि सुशांत त्यांच्या आयुष्यात पुढे गेले, परंतु असे दिसते की, त्यांच्यामध्ये काहीही ठीक नाही.

image.png

मीडिया रिपोर्टनुसार, सुशांतला सारासोबत एका ब्रँडसाठी जाहिरातीमध्ये काम करण्याची ऑफर आली होती. सुशांतने ती जाहिरात करण्यास नकार दिला. रिपोर्ट्सनुसार, सुशांतला कोणत्याही परिस्थितीत त्याच्या एक्स बरोबर काम करायचे नव्हते. सध्या सुशांतच्या अफेअरची चर्चा रिया चक्रवर्तीसोबत सुरू आहे. दोघेही बर्‍याच ठिकाणी एकत्र फिरत असतात. दुसरीकडे, सारा आणि कार्तिकची अफेअरची चर्चा सुरु आहे.

image.png

सुशांतचा ‘छिछोरे’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेला ‘छिछोरे’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. तर सारा कार्तिकच्या इम्तियाज अलीच्या चित्रपटात दिसणार आहे. साराचे दोन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, परंतु अल्पावधीतच तिने चित्रपटसृष्टीवर वर्चस्व गाजवले आहे.

image.png
Loading...
You might also like