Video : जेव्हा सुशांत सिंह राजपूतनं गझल गात जिंकलं होतं चाहत्यांचं मन, झपाट्यानं व्हायरल होतोय व्हिडीओ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं आहे. चाहते आणि सेलेब्स अजूनही सुशांतची आठवण काढत आहेत. सध्या सुशांतचे अनेक जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुशांतचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत सुशांतचं आणखी एक टॅलेंट पाहायला मिळत आहे.

सुशांतचा एक व्हिडीओ इंस्टावरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत सुशांत गझल गाताना दिसत आहे. अगदी एखाद्या प्रोफेशनल सिंगर प्रमाणे सुशांत गझल गात आहे. वुम्पुलानं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत दीड लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.

सुशांतचं हे टॅलेंटही चाहत्यांना खूप आवडलं आहे. अनेकांनी यावर कमेंट करत सुशांतच्या या टॅलेंटचं कौतुक केलं आहे. सुशांतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2013 साली आलेल्या काय पो छे या सिनेमातून त्यानं बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर त्यानं शुद्ध देसी रोमांस, पीके, धोनी : द अनटोल्ड स्टोरी, केदारनाथ, छिछोरे अशा अनेक मोठ्या सिनेमात काम केलं आहे. त्याचा शेवटचा सिनेमा दिल बेचारा 24 जुलै 2020 रोजी रिलीज होणार आहे. हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज केला जाणार आहे.