सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्तिनं अभिनेत्याला दिला अंतिम निरोप, शेअर केली इमोशनल नोट !

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत आज आपल्यात नाही. त्याच्या कुटुंबात तो एकुलता एक मुलगा होता. चार बहिणींमध्ये तो एकटाच भाऊ होता. अलीकडेच कुटुंबानं त्याचे अखेरचे काही विधी पूर्ण केले आहेत. सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्ति हिनं घरी झालेल्या प्रार्थनेचे काही फोटो फेसबुकवरून शेअर केले आहेत आणि लहान भावाला अंतिम निरोप दिल आहे. श्वेतानं एक इमोशनल मेसेज लिहिला आहे.

श्वेतानं तिच्या फेसुबक पोस्टमध्ये लिहिलंय की, “माझ्या लहान भावाला प्रेम आणि सकारात्मकतापूर्वक अंतिम निरोप. आशा आहे जिथं कुठे असशील खुश असशील. आम्ही कायम तुझ्यावर प्रेम करत राहू. अनंत काळापर्यंत.” श्वेताची ही पोस्ट वाचल्यानंतर चाहेतही पुन्हा एकदा भावूक झाले आहेत. सध्या श्वेताची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

A Final love and positivity filled send-off to my little brother. Hope you always stay happy where ever you are…. we will always love you for eternity. ❤️ #Sushantsinghrajput

Posted by Shweta Singh Kirti on Sunday, June 28, 2020

बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. यात एकूण 27 लोकांचा समावेश आहे ज्यात त्याचे नोकर, कुटुंबीय, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, मित्र सिद्धार्थी पिटानी, सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचे डायरेक्टर मुकेश छाबडा यांचा समावेश आहे. अलीकडेच पोलिसांनी सुशांतचा आगामी सिनेमा दिल बेचारा मधील त्याची कोस्टार संजना संघी हिची चौकशी केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like