Sushant Singh Rajput Suicide Case : अंकिता लोखंडेनं सांगितलं आत्महत्येबद्दल काय म्हणत होता सुशांत सिंह राजपूत ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात बऱ्याचं गोष्टी समोर आल्या आहेत. अभिनेत्याची माजी गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेही सतत माध्यमांना मुलाखत देत असून सुशांतशी संबंधित गोष्टी सांगत आहे. नुकताच अभिनेत्री अंकिता लोखंडेने सुशांतच्या नैराश्याविषयी चर्चा करताना म्हटले की, सुशांतसिंग राजपूत नैराश्यात होता यावर माझा विश्वास नाही. अभिनेत्री म्हणते, ‘सुशांतसिंह राजपूत डिप्रेशनमध्ये नव्हता. मी त्याला बर्‍याच वर्षांपासून ओळखते आणि मी या सर्व गोष्टींचा विचारही करू शकत नाही. मी त्याला इतर लोकांना चिअर करताना पाहिले आहे.’

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुशांतबाबत म्हंटले कि, ‘तो नेहमी हसत राहायचा, त्याने अनेक गोष्टींचा सामना केला होता. त्याला नैराश्य येऊ शकते? ‘ तिने सुशांतबद्दलही सांगितले, ‘एक दिवस आम्ही एका आत्महत्येबद्दल बोलत होतो, तो म्हणाला की हा विचार माझ्या मनात आला तर मी 15 मिनिटांत स्वत: ला बरे करील. आत्महत्या ही खूप चुकीची गोष्ट आहे, असे तो म्हणायचा.

अभिनेत्रीने स्वतः आणि सुशांतबद्दल सांगितले की, ‘आम्ही अगदी लहान वयातच कामाला सुरुवात केली होती, आधी आम्ही शाळेत जात होतो आणि खूप दमायचो. त्यानंतर सुशांतने एक स्कोडा कार घेतली आणि आम्ही गाडीने जायचो. तसेच, अभिनेत्रीने असा प्रश्न उपस्थित केला की, त्याने असे का केले? हे मला जाणून घायचे आहे. सत्य समोर आले पाहिजे. त्याचवेळी अभिनेत्रीने सुशांत आणि त्याच्या कुटुंबीयांविषयी सांगितले की, “सुशांतच्या वडिलांनी मला फोन करून सुशांतशी बोलण्यास सांगितले, तिच्याजवळ नवीन नंबर नव्हता .” अभिनेत्री अंकिताने मुलाखतीत इतरही बऱ्याच गोष्टी उघड केल्या आहेत, ज्यात तिने लोकांना सुशांत सिंह आणि त्याच्या नात्याबद्दल सांगितले.