सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत 35 जणांची चौकशी, पण ‘भाईजान’ सलमान खानची चौकशी नाही होणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आहे. यात जवळपास 35 लोकांचा समावेश आहे ज्यात त्याचे नोकर, कुटुंबीय, गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, मित्र सिद्धार्थी पिटानी, सुशांतच्या शेवटच्या सिनेमाचे डायरेक्टर मुकेश छाबडा, सुशांतचा आगामी सिनेमा दिल बेचारा मधील त्याची कोस्टार संजना संघी, बॉलिवूड डायरेक्टर संजय लीली भन्साळी, यश राज फिल्म्स कास्टींग डायरेक्टर शानू शर्मा यांच्यासह इतरांचा समावेश आहे. गेल्याच आठवड्यात पोलिसांनी रेश्मा शेट्टीचीही चौकशी केली. रेश्मा सलमानची खानची एक्स मॅनेजर राहिली आहे. यानंतर असं बोललं जात होतं की, पोलीस आता सलमान खानची चौकशी करणार आहे. परंतु आता अशी माहिती आहे की, पोलीस या प्रकरणी सलमानची कोणतीही चौकशी करणार नाही.

एका वृत्तानुसार, डीसीपींनी सलमान खानची चौकशी करणार असल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. सुशांतच्या निधानंतर असंही बोललं गेलं की, सुशांत खूप टॅलेंटेड होता. परंतु बॉलिवूडमधील काही लोकांनी त्याला असं काही निराश केलं की, तो डिप्रेशनमध्ये गेला आणि त्यानं हे पाऊल उचललं.

बिहारच्या मुजफ्परपूरमध्ये फिल्ममेकर करण जोहर, संजय लीला भन्साळी, एकता कपूर, सलमान खान यांच्यासह 8 जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली गेली होती. आयपीसी मधील 306, 109, 504 आणि 506 कलमंतर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांच्यावर बॉलिवूडमधील भाई जातिवाद, नेपोटीजम आणि पक्षपात केल्याचा आरोप होता. परंतु हे प्रकरण न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरचं आहे असं सांगत मुजफ्फरपूरचे मुख्य न्यायदंडाधिकारी मुकेश कुमार यांनी विकल सुधीर कुमार ओझाकडून दाखल करण्यात आलेली ही याचिका फेटाळली होती.