सुशांत सिंह राजपूतचा ‘हा’ व्हिडीओ सोशलवर प्रचंड व्हायरल होतोय, तुमच्याही डोळ्यात येईल पाणी ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं आहे. चाहते आणि सेलेब्स अजूनही सुशांतची आठवण काढत आहेत. सध्या सुशांतचे अनेक जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुशांतचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. यात सुशांत एका वृद्ध महिलेचा आशीर्वाद घेताना दिसत आहे.

सध्या सुशांतचा एख व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात दिसत आहे की, सुशांत एका वृद्ध महिलेसमोर बसला आहे. ती महिला व्हील चेअरवर आहे. व्हिडीओत दिसत आहे की, जमिनीवर बसलेला सुशांत त्या महिलेचा हात त्याच्या डोक्यावर ठेवून घेत आशीर्वाद घेत आहे. नंतर सुशांतही तिच्या डोक्यावरून हात फिरवताना दिसत आहे. यावरून तो किती दयाळू आणि प्रेमळ होता हे दिसत आहे.

सध्या सुशांतचा हा व्हिडीओ तुफान शेअर केला जात आहे. अनेक चाहते हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत. हा व्हिडीओ एवढा इमोशनल आहे की, तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like