‘रेप्युटेशन’बाबत खुप ‘गंभीर’ होता सुशांत, रियाला स्वतःच्या जीवनातून बाहेर करण्याचं केलं होतं पूर्ण ‘प्लॅनिंग’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   सुशांत सिंह राजपूतने खुप कमी कालावधीत फिल्म जगतात आपले स्थान निर्माण केले होते. त्याच्याकडे खुप पैसा नव्हता, परंतु आपल्या चित्रपटांमधून त्याने खुप किर्ती मिळवली होती. याच कारणामुळे सुशांतला आपली ही ठेव जपून ठेवायची होती. यासाठी तो आपली प्रसिद्धी, मानसिक शांतता आणि कुटुंबामध्ये अडचण ठरत असलेली लिव्ह इन पार्टनर रिया चक्रवर्तीपासून त्याला त्वरित मुक्तता हवी होती. यासाठी त्याने पूर्ण प्लॅनिंग केले होते.

यासाठी सुशांत टप्प्याने पावले टाकत होता. सर्वप्रथम त्याने 2020 च्यासाठी जे प्लॅनिंग तयार केले, त्यामध्ये रियाला सहभागी केले नाही. याचे कारण हे होते की, हे प्लॅनिंग त्याने पूर्णपणे आपल्यासाठी केले होते. या प्लॅनिंगमध्ये अनेक नावे आहेत, ज्यामध्ये एक फिल्म अभिनेत्री आणि सुशांतची चांगली मैत्रिण श्रद्धा कपूर सहभागी होऊ शकते आणि सोबतच या प्लॅनिंगमध्ये सुशांतची मोठी बहिण प्रियंकासुद्धा सहभागी होऊ शकते, जी त्याच्या सर्वात जवळ होती.

सुशांतच्या वैयक्तिक डायरीची सहा पाने आयएएनएसच्या जवळ आहेत. ही तिच डायरी आहे, जिची चार पाने गायब आहेत किंवा गायब करण्यात आली आहेत. परंतु बाकीची जी पाने आहेत, त्यामधील एक पान खुपच महत्वाचे आहे, ज्यामध्ये सुशांतने रेप्युटेशन बिल्डिंग आणि ब्रँड बिल्डिंगचा पूर्ण प्लॅन बनवून ठेवला होता. याशिवाय सुद्धा सुशांतला अनेक गोष्टींवर काम करायचे होते, ज्यामध्ये इन्कम जनरेटचे साधन निर्माण करणे, मनी मॅनेजमेंट, लीगल टीम, प्लॅनिंग आणि रणनितीचा समावेश होता आणि यासाठी त्याला विविध टीम बनवायच्या होत्या.

त्याचे व्हिजन एकदम सुस्पष्ट होते. या कोर टीमच्या माध्यमातून त्याला 2020 मध्येच हॉलीवुडमध्ये आपले पाऊल ठेवायचे होते. याशिवाय त्याला आपल्या रेप्युटेशनवर काम करायचे होते. याचे कारण हे होते की, रिया त्याच्या जीवनात आल्यानंतर तो कुटुंबापासून दूर जात आहे, आणि नातेवाईक तसेच इंडस्ट्रीमध्ये त्याचे रेप्युटेशन खराब होत आहे, असे त्याला वाटत होते.

सुशांतला रियापासून दूर व्हायचे होते आणि तेसुद्धा शक्य तेव÷ढ्या लवकर. याच कारणामुळे सुशांतच्या प्लॅनिंगमध्ये रिया कुठेही दिसत नाही. रुमी जाफरीच्या आगामी फिल्ममध्ये रिया आणि सुशांत एकत्र येत असल्याची चर्चा होती, परंतु यामध्ये सुशांतची इच्छा नव्हती.

सुशांतचा जवळचा मित्र महेश शेट्टीने आयएएनएससोबत संक्षिप्त टेलीफोनिक चर्चेत या गोष्टीला दुजोरा दिला. शेट्टीने म्हटले की, सुशांत आपल्या रेप्युटेशनबात खुप गंभीर होता. त्याला रियासारख्या अनोळखी अभिनेत्री सोबत कधी काम केले नसते. त्याला लवकरात लवकर रियापासून दूर व्हायचे होते.

शेट्टी, सुशांतच्या कुटुंबाच्या खुप जवळचा आहे, यामुळे त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. याचा पुरावा सुशांतच्या प्लॅनिंगमध्ये सुद्धा मिळतो. कारण कोर टीम, इमेज बिल्डिंग टीम, इत्यादीमध्ये कुठेही रिया किंवा तिच्या कुटुंबातील कुणालाही त्याने सहभागी केलेले नाही. महत्वाचे म्हणजे, सुशांतने एक लीगल टीम बनवण्याचे ठरवले होते, जी बहुतेक रियापासून मुक्ती मिळवण्यासोबतच त्याच्या बाकीच्या प्रोजेक्टचे लीगल मॅटर सांभाळण्यासाठी बनवण्यात येणार होती.

सुशांतच्या डायरीत या गोष्टीचाही उल्लेख आहे की, त्याला आपले अ‍ॅक्टिंग स्किल सुद्धा अपग्रेड करायचे होते आणि यासाठी त्याला अनेक भाषा शिकायच्या होत्या. सोबतच त्याला इतर देशांच्या संस्कृतीबाबत जाणून घ्यायचे होते. आपल्या डायरीच्या एका पानात सुशांतने हा सुद्धा उल्लेख केला आहे की, तो पर्यावरण आणि शिक्षणाबाबत खुप गंभीर आहे आणि यासाठी त्याला काम करायचे आहे. याच कारणामुळे सुशांतला केरळमध्ये आर्गेनिक फार्मिंग करायचे होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like