स्वर्गाच्या दरवाज्यावर असताना देवाकडून काय ऐकायला तुला आवडेल ? सुशांत सिंह राजपूतनं दिलं होतं सुंदर उत्तर !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत यानं रविवारी (दि 14 जून 2020) गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जगाचा निरोप घेतला. अचानक समोर आलेल्या या घटनेनं साऱ्यांनाच हादरून सोडलं. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. 34 वर्षीय सुशांत ब्रांद्र्याच्या माऊंट ब्लांच बिल्डींगच्या सहाव्या मजल्यावर डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहत होता. त्याच्या निधानानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देत दु:ख व्यक्त केलं आहे. चाहते आणि सेलेब्स अजूनही सुशांतची आठवण काढत आहेत. सध्या सुशांतचे अनेक जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुशांतचा असाच एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होत आहे. यात सुशांत स्वर्गाबद्दल बोलत आहे. एका मुलाखतीमधील त्याचा हा व्हिडीओ आहे.

मुलाखतीत सुशांतला विचारलं की, तू स्वर्गाच्या दरवाज्यावर आहेस अशा तर अशा वेळी देवाच्या तोंडून तुला काय ऐकायला आवडेल. सुशांतनं खूप सुंदर उत्तर दिलं होतं. सुशांत म्हणाला की, हे एक असायला हवं. म्हणजेच सुशांतची अशी इच्छा की, आहे की, देवानंच त्याला सांगावं हे एक स्वप्न आहे. सुशांतच्या या उत्तरानं अनेक चाहत्यांचं मन जिंकलं आहे.

सुशांतच्या या उत्तरातून दिसत आहे की, हे सगळं फेस करण्याची त्याची अजिबात इच्छा नाही. म्हणजेच त्याला जास्तीत जास्त जगायचं आहे असं त्याचं म्हणणं होतं.

अलीकडेच सुशांतचा विसेरा रिपोर्ट समोर आला आहे ज्याची पोलिसांना प्रतिक्षा होती. हा रिपोर्ट आता आला आहे. यात त्याच्या मृत्यूची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

सुशांतच्या विसेरा रिपोर्टमध्ये अशी माहिती देण्यात आलीय की, अभिनेत्याच्या शरीरात कोणत्याही प्रकारचं संशयास्पद रसायन किंवा विष असल्याचं आढळून आलेलं नाही. आता हे स्पष्ट होत आहे की सुशांतनं आत्महत्या केली आहे. मुंबईच्या जूहूमधील कूपर हॉस्पिटलमध्ये सुशांतचं पोस्ट मॉर्टेम झालं होतं.