सुष्मिता सेनच्या वाढदिवशी रोमँटीक झाला बॉयफ्रेंड रोहमन शॉल ! Kiss करत म्हणाला…

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिनं गुरुवारी (दि 19 नोव्हेंबर) तिचा 45 वा वाढदिवस साजरा केला. तिचा जन्म 19 नोव्हेंबर 1975 साली हैदराबादमध्ये झाला होता. सर्वांनीच तिच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. परंतु या सगळ्यात बाजी मारली ती म्हणजे तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल (Rohman Shawl) यानं. त्यानं तिच्या वाढदिवसानिमित्त खूपच रोमँटीक पोस्ट शेअर केली आहे.

रोहमननं त्याच्या इंस्टावरून एक रोमँटीक फोटो शेअर केला आहे. या पोटोत तो सुष्मिताच्या कपाळावर किस करताना दिसत आहे. हा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. फोटोत दोघांचीही शानदार केमिस्ट्री दिसत आहे. सध्या हा फोटो सोशलवर व्हायरल होत आहे. रोहमननं या पोस्टमधून खुल्लम खुल्ला प्रेम व्यक्त केलं आहे. चाहत्यांनाही त्यांचा हा रोमँटीक अंदाज खूप आवडला आहे. अनेक कमेंट करत या जोडीचं कौतुकदेखील केलं आहे.

रोहमननं हा फोटो शेअर करताना लिहिलं की, काही नाही म्हटलं तर काहीतरी अधुरं राहून जाईल. काही म्हटलं तरी ते पूर्ण होणार नाही. तू अद्वितीय आहेस हे जगानं मान्य केलं आहे. तू कमाल आहेस हे मी तुझ्याकडे आल्यावर जाणलं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझी babushhhhhh.