एवढी वर्षे ‘नेपोटीजम’पासून कशी वाचलीस ? सुष्मिता सेननं दिलं ‘जबरदस्त’ उत्तर !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आता घराणेशाहीचा मुद्दा जोरावर आहे. अनेकजणांचं म्हणणं हे की, बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी इंडस्ट्रीत टिकणं काही लोक मुश्किल करत आहेत. इतकंच नाही तर इतरही अनेक लोक बोलते झाले आहेत आणि आपले इंडस्ट्रीतले अनुभव सांगत आहेत. बॉलिवूडमध्ये असेही काही कलाकार आहेत ज्यांनी नेपोटीजम आणि पॉलिटीक्स असूनही इंडस्ट्रीत आपलं करिअर बनवलं आहे. यापैकीच एक आहे ती म्हणजे बॉलिवूड स्टार सुष्मिता सेन. ट्विटरवर जेव्हा सुष्मिता सेन हिला यामागील कारण विचारलं तेव्हा तिनं जबरदस्त उत्तर दिलं आहे.

अलीकडेच सुष्मिता सेननं ट्विटरवर एक सेशन घेतलं. यावेळी एका चाहत्यानं तिला विचारलं की, एवढी वर्षे तू नेपोटीमजमपासून स्वत:चा बचाव कसा केलास. या प्रश्नाला उत्तर देताना सुष्मितानं खूप खास उत्तर दिलं. सुष्मिता म्हणाली, “माझ्या प्रेक्षकांवर फोकस करून. तुमच्या मुळेच मित्रांनो. तुम्ही मला पाहणं पसंत केलं तर मी काम करत राहिल.”

सुष्मितानं नेपोटीजमवर जे काही उत्तर दिलं आहे ते आता साऱ्यांनाच आवडलं आहे. तिचं ट्विटर सध्या सोशलवर व्हायरल होत आहे.

सुष्मिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 2010 मध्ये आलेल्या नो प्रॉब्लेम सिनेमात ती शेवटची दिसली होती. 2015 साली आलेल्या निर्बाक या सिनेमातून तिनं बंगाली सिनेमात डेब्यू केला होता. हा सिनेमा श्रीजीत मुखर्जीनं डायेरक्ट केला होता. आता ती आर्या या वेब सीरिजमधून तिनं कमबॅक केलं आहे. खास बात अशी की, हा सुष्मिताचा डिजिटल डेब्यू आहे.