Advt.

‘लॉकडाऊन’मध्ये सुष्मिता सेननं सर्वांना सांगितली ‘Love Story’! व्हिडीओ होतोय झपाट्यानं व्हायरल (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सुष्मिता सेन सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. अलीकडेचं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल आहे आणि चाहत्यांसोबत आपली लव स्टोरी शेअर केली आहे.

सुष्मितानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिच्या मुली पियानो वाजवत आहेत. एलिजा आणि ऋने पियानोवर काही ट्युन्सची प्रॅक्टीस करत आहेत. व्हिडीओ शेअर करताना सुष्मितानं खास कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये सुष्मिता म्हणते, “माझी लव स्टोरी, आय लव यु गाईज.”

व्हिडीओत दिसत आहे की, एलिजा आपली मोठी बहिण ऋनेला गाईड करत आहे. दोघी पियोनावर प्रॅक्टीस करत आहे. सुष्मितानं शेअर केलेला हा व्हिडीओ चाहत्यांनाही खूप आवडला आहे.

सुष्मिता तिच्या मुली आणि बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत आपला लॉकडाऊनचा पीरियड घालवत आहे. आपल्या खासगी आयुष्यामुळं ती नेहमीच चर्चेत येताना दिसत असते. रोहमनची मुलींसोबत चांगली बाँडिंग आहे. सुष्मितानं अनेकदा त्यांचे एकत्र फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.