Video : सुष्मिता सेननं शेअर केला वर्कआउट व्हिडिओ ! म्हणाली- ’45 वर्षांची झाल्याचा अभिमान’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिनं कालच (दि 19 नोव्हेंबर रोजी) तिचा 45 वा वाढदिवस साजरा केला. तिचा जन्म 19 नोव्हेंबर 1975 साली हैदराबादमध्ये झाला होता. सर्वांनीच तिच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला. परंतु या सगळ्यात बाजी मारली ती महणजे तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल (Rohman Shawl) यानं. त्यानं तिच्या वाढदिवसानिमित्त खूपच रोमँटिक पोस्ट शेअर केली होती. सुष्मितानं रोहमन आणि तिच्या मुलींसोबत वाढदिवस साजरा केला. यानंतर आता सुष्मिता एका व्हिडिओमुळं चर्चेत आली आहे.

सुष्मितानं तिच्या इंस्टावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती वर्कआउट करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना सुष्मिता म्हणते, 45 वर्षांची झाल्याचा मला अभिमान आहे. माझ्या भावनात्मक शक्तीचा गेल्या 2 दशकांपासून तुम्ही सगळे सोर्स आहात. तुम्ही मला वारंवार याची आठवण करून देता की, आयुष्य किती मोठा आशीर्वाद आहे.

वाढदिवसांच्या शुभेच्छा देणाऱ्यांचेही तिनं मनापासून आभार मानले आहेत. तिला अशाच सर्व प्रेम करणाऱ्या चाहत्यांची गरज आहे असंही ती म्हणाली आहे.

सुष्मितानं शेअर केलेली पोस्ट सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी यावर कमेंट करत तिचं कौतुकही केलं आहे.

सुष्मिताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर 2010 मध्ये आलेल्या नो प्रॉब्लेम सिनेमात ती शेवटची दिसली होती. 2015 साली आलेल्या निर्बाक या सिनेमातून तिनं बंगाली सिनेमात डेब्यू केला होता. हा सिनेमा श्रीजीत मुखर्जीनं डायेरक्ट केला होता. आता आर्या या वेब सीरिजमधून तिनं कमबॅक केलं आहे. खास बात अशी की, हा सुष्मिताचा डिजिटल डेब्यू आहे.

You might also like