सुझान खानने अटकेच्या वृत्तावर दिले स्पष्टीकरण, पोस्ट शेयर करून सांगितले संपूर्ण प्रकरण

मुंबई :पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलीवुड अभिनेता ऋतिक रोशनची एक्स वाइफ सुझान खान (Suzanne Khan) बाबत मंगळवारी मीडिया रिपोर्टद्वारे एक शॉकिंग वृत्त आले होते. यामध्ये म्हटले होते की, कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे मुंबईत 22 डिसेंबर ते 5 जोवारीपर्यंत लावलेल्या नाइट कर्फ्यूचे उल्लंघन केल्याच्या आरोपात 34 लोकांसह ऋतिक रोशन(Hrithik Roshan)ची एक्स वाइफ सुझान खान, सिंगर गुरु रंधवा आणि क्रिकेटर सुरेश रैना (Cricketer Suresh Raina) वर प्रकरण दाखल करण्यात आले आहे. मात्र, आता या प्रकरणावर स्वत: सुझान खानने सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने ही सर्व वृत्त चुकीची असल्याचे सांगत नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे.

सुझान खानने इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले की, माझे सविनय स्पष्टीकरण – मी काल रात्री एका जवळच्या मित्राच्या बर्थडे डिनरसाठी गेले होते आणि आमच्यापैकी काही लोक जेडब्लू मॅरिएट, सहार येथील ड्रॅगन फ्लाय क्लबमध्ये पोहचले होते. मध्यरात्री 2:30 वाजता अधिकारी क्लबमध्ये आले. जेव्हा क्लब मॅनेजमेंट आणि अधिकारी आवराआवर करत होते, तेव्हा तिथे उपस्थितीत सर्व पाहुण्यांना 3 तास प्रतिक्षा करण्यास सांगण्यात आले. आम्हाला अखेर 6 वाजता जाऊ दिले. यासाठी मीडियाकडून असा अंदाज वर्तवण्यात आला की, तिथे अटक झाली आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे आणि बेजबाबदार होते.

सुझानने पुढे लिहिले – मला हे समजले नाही की, आम्हाला प्रतिक्षा का करण्यास सांगितले आणि अधिकारी आणि क्लबमध्ये काय प्रकरण होते. मी या वक्तव्याद्वारे सर्व गोष्टी स्पष्ट करत आहे. मी मुंबई पोलीसचा खुप सन्मान करते की, ते आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी निरंतर प्रयत्नशील असतात. त्यांच्या सदैव तत्परतेशिवाय आम्ही मुंबैकर्स सुरक्षित राहू शकत नाही.