मुंबईच्या पहिल्या पावसात सुतापा सिकदरला सतावतेय पती इरफान खानची आठवण ! म्हणाली – ‘मी तुला ऐकू शकते…’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार इरफान खाननं जगाचा निरोप घेऊन 1 महिन्याहून अधिक वेळ झाला आहे. पत्नी सुतापा सिकदरनं पुन्हा एकदा एक इमोशनल पोस्ट शेअर करत सर्वांना भावूक केलं आहे. 29 एप्रिल 2020 रोजी इरफाननं जगाचा निरोप घेतला होता. नुकताच मुंबईत पहिला पाऊस पडला ज्यानंतर सुतापाला इरफानची आठवण आली आहे. तिनं काही फोटोही सोशलवर शेअर केले आहेत.

सुतापा सिकदर हिनं तिच्या फेसबुकवरून काही फोटो शेअर केले आहेत. यात इरफान खानसोबतच्या पहिल्या पावसातील काही आठवणी दिसत आहेत. काही फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सुतापा म्हणते, “तुझे आभार मी तुला ऐकू शकते. होय.. मला माहित आहे हे तुझ्याकडून आहे. हे माझ्या शरीर आणि आत्म्याला स्पर्श करून गेलं आहे. दोन्ही जगांच्यामध्ये हा पाऊसच तर आहे जो आपल्या जोडण्याचं काम करत आहे.

सुतापानं शेअर केलेली ही पोस्ट सध्या सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. यात इरफान नदी किनारी झोपलेला दिसत आहे. सुतापानं पाऊस, झाडे आणि आकाशाचे काही फोटो शेअर केले आहेत.