‘या’ कारणामूळे ‘भाजप’ खासदाराने मागितली स्वरा भास्करची ‘माफी’ !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – भाजपच्या उत्तरप्रदेशच्या फैजाबादमधील खासदार लल्लू सिंह ने बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करची माफी मागितली. लल्लू सिंहने ट्विटवर माफी मागत लिहिले की, हे कृत्य चुकून झाले, ज्यासाठी मी तुमची माफी मागतो. भावना दुखावण्याचा माझा कोणताही उद्देश नाही.

भाजपच्या खासदाराने माफी मागितल्यानंतर आता स्वरा भास्करने सन्मानजनक भाषेत सांगितले की, तुमच्या स्पष्टीकरणासाठी तुमचे खूप आभार लल्लू सिंहजी. या शालीन प्रतिक्रियेबद्दल तुमचे आभार !

याआधी स्वरा भास्करने लल्लू सिंह यांच्या एका ट्विटवर प्रतिक्रिया देत म्हणले होते की, मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्रच्या नगर आयोध्येचे खासदार लल्लू सिंह तुमच्या ट्विटर हँडलने काल रात्री एक ट्विट लाइक केले होते. तुमची ही प्रतिक्रिया तुमची सामाजिक समस्या आणि मानसिकता दर्शवते. कृपया माझा मेसेज वाचण्याचे कष्ट घ्या.

या ट्विटमध्ये तिने लिहिले होते की, माननीय खासदार महोद्य लल्लू सिंह. तुम्ही आयोद्ध्येचे प्रतिनिधित्व करतात. महिलांना त्रास देणाऱ्या, बलात्करी मानसिकता असलेल्या आणि या देशाच्या सायबर कायद्याच्या विरोधात सायबर जगतात लैगिंक छळ करणाऱ्या या अत्यंत घाणेरड्या ट्विटला तुम्ही लाइक केले. तुम्ही याला प्रोस्ताहन देत आहेत.

स्वराने केलेल्या एका ट्विटवर एक वाईट कमेंट आली होती, त्याचा स्क्रीनशॉट देखील तिने दिला होता. ज्यात भाजप खासदाराने स्वरा भास्करच्या पोस्टवर एक कमेंटला लाइक केले होते. यामुळे भाजप खासदाने स्वरा भास्करची माफी मागितली.

आरोग्यविषयक वृत्त