Video : तापसी पन्नूनं ‘रण ऑफ कच्छ’मध्ये मारले Pushups ! वारंवार पाहिला जातोय ‘हा’ व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड ॲक्ट्रेस तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिनं तिच्या आगामी सिनेमाची शुटींग सुरू केली आहे. रश्मी रॅकेट (Rashmi Rocket) असं या सिनेमाचं नाव आहे. काही तापसीनं या सिनेमाचा फर्स्ट लुक शेअर केला होता. सिनेमात तापसी ॲथलिटच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं डायरेक्शन आकर्ष खुराना (Akarsh Khurana) करणार आहे. सध्या सिनेमाची शुटींग ही रण ऑफ कच्छ मध्ये सुरू आहे. तसं तर इथली शुटींग पूर्ण झाली आहे. तापसीनं इथले काही फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर केले आहेत जे सध्या चर्चेत आहेत. यातील एक व्हिडीओ खास अटेंशन घेताना दिसत आहे.

तापसीनं तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओची खास बात अशी की, यात ती पुशअप्स मारताना दिसत आहे. कुरळ्या केसांमुळं तिचा चेहराही लपत आहे. तिनं यासाठी खास कॅप्शनही दिलं आहे.

तापसीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी कमेंट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे. चाहत्यांनी तिच्या पुशअप्सचं कौतुक केलं आहे. काहींना तर तिचा लुक विशेष आवडला आहे.

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर सिनेमाची निर्मिती रॉनी स्क्रूवालानं केली आहे. याच वर्षी हा सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमात तापसी सोबत ॲक्टर अभिषेक बॅनर्जी आणि प्रियांशु पेनयुली हे कलाकारही दिसणार आहेत.

तापसीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती थप्पड सिनेमात दिसली होती. यानंतर आता ती शाबाश मिठू मध्ये क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीत हा सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा क्रिकेटर मिताली राजचं बायोपिक आहे. याशिवाय हसीन दिलरूबा हाही प्रोजेक्ट तिच्याकडे आहे. या सिनेमात तिच्यासोबत विक्रांत मेसी, हर्षवर्धन राणे, हंसिका मोटवानी, ताहिर शब्बीर असे कलाकार दिसणार आहेत. लूप लपेटा, रश्मी रॅकेट हे सिनेमेही तिच्याकडे आहेत. रश्मीचा रॅकेटचा फर्स्ट लुकही समोर आला आहे.