भूल भुलैया 2 : विद्या बालनच्या ‘आमी जे तोमार’ या गाण्यात दिसणार ‘ही’ अभिनेत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – गेल्या अनेक दिवसांपासून अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या 2007 साली आलेल्या भूल भूलैया या सिनेमाच्या येणाऱ्या दुसऱ्या पार्टबद्दल चर्चा सुरू असल्याचं दिसत आहे. भूल भुलैया सिनेमात अक्षय कुमार लिड रोलमध्ये होता. नवीन पार्टमध्ये आता अक्षयच्या जागेवर कार्तिक आर्यन दिसणार आहे. आणखी एक मोठा बदल सिनेमात करण्यात आला आहे. या सिनेमात बंगाली लिरीक्स असणारं गाणं आमी जे तोमार हे गाणं खूप हिट झालं. विद्याचा डान्स सर्वांनाच आवडला होता. आता अशी माहिती आहे की विद्याच्या या आयकॉनिक गाण्यात आता तब्बू दिसणार आहे. याशिवाय सिनेमाची स्टोरीही नवीन आहे.

भूल भुलैया 2 या सिनेमात कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी लिड रोलमध्ये दिसणार आहे. सिनेमाची शुटींग या शुक्रवारी जयपूरला सुरू केली जाणार आहे. अनीस बाजमीच्या या सिनेमात पहिल्या पार्टमधील दोन गाणी रिक्रिएट केली जाणार आहेत. हरे कृष्णा हरे राम आणि आमी जे तोमार ही ती गाणी असणार आहेत. ही दोन गाणी सोडली तर फक्त सिनेमाचं नाव सेम आहे बाकी स्टोरी पूर्णपणे वेगळी असणार आहे असंही अनीस बाजमीनं सांगितलं आहे.

View this post on Instagram

💜 #anissamaangayi

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani) on

गोलमाल 4 नंतर तब्बूचा हा दुसरा हॉरर कॉमेडी सिनेमा असणार आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे. गेल्या सिनेमात अक्षय कुमार ज्या लुकमध्ये दिसत होता त्याच लुकमध्ये कार्तिक आर्यन दिसत आहे.

You might also like