तैमूर अली खान आणि इनाया कुणाल खेमूनं साजरी केली ‘होळी’, फोटो पाहून आठवतील लहानपणीचे दिवस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – तैमूर अली खान, इनाया आणि कुणाल खेमूनं साजरी केली ‘होळी’, फोटो पाहून आठवतील लहानपणीचे दिवस.

बॉलिवूड स्टार करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा लाडका तैमूर अली खान यानंही होळीचा भरपूर आनंद घेतला आहे. करीना कपूरनं तिच्या इंस्टा स्टोरीवरून काही फोटो शेअर केले आहेत जे सध्या व्हायरल होत आहेत.

करीनानं तिचं इंस्टा अकाऊंट सुरू केल्यानंतर अनेक पोस्ट शेअर करायला सुरुवात केली आहे. नुकताच तिनं इंस्टा स्टोरीवर तैमूरचा फोटो शेअर केला ज्यात तो रंग खेळताना दिसत आहे. फोटो शेअर करताना करीनानं लिहिलं की, “असं वाटतंय की, गुलाबी त्याचाही रंग आहे.” याशिवाय करीनानं तिचा एक सेल्फीदेखील इंस्टावर शेअर केला आहे. सेल्फी शेअर करताना कॅप्शनमध्ये ती म्हणते, “मला वाटतं की, गुलाबी माझा रंग आहे. या गोष्टीशी सहमत ?” तैमूर आणि करीना या दोघांच्याही फोटोची खासियत ही आहे की, दोघांनीही व्हाईट कलरचे कपडे घातले आहेत. दोघांच्याही चेहऱ्यावर सेम पिंक कलर दिसत आहे.

तैमूरनं होळीच्या निमित्तानं सैफ अली खानची बहिण सोहा अली खान आणि कुणाल खेमू यांची लाडकी इनायासोबत रंग खेळण्याचा आनंद घेतला. तैमूर आणि इनायाचा फोटोही सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.