दीपिका पादुकोण म्हणते ‘तैमूरला चोरून न्यायचंय’, आलिया भटनं दिली ‘अशी’ रिअ‍ॅक्शन (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा नन्हा नवाब तैमूर अली खान सर्वात फेमस स्टारकिड आहे. त्याचे फोटो, व्हिडीओज नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. अलीकडेच सैफ आणि करीनानं एक फोटोशुट केलं. यावेळी सेटवर तैमूर देखील दिसला होता. तैमूरचा एक क्युट व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून दीपिका पादुकोण कमेंट करण्यापासून स्वत:ला आवरू शकली नाही. तिनं त्याला चोरण्याचं विधान केलं आहे.

तैमूरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात सैफ आणि करीना फोटोशुट करत आहेत. व्हिडीओत दिसत आहे की, तैमूर त्यांच्या दिशेनं उभा आहे आणि त्याच्या हातात ब्लोअर आहे जो त्यानं त्यांच्या दिशेनं धरला आहे आणि त्याला ऑन करत आहे. तैमूरचा हा क्युटनेस पाहून सारेच त्याच्यावर फिदा झाले आहेत. दीपिका पादुकोणनं त्याच्यावर कमेंट केली आहे, “त्यालाच चोरून न्या.” यानंतर आलिया भटनंही कमेंट केली आहे. आलिया म्हणते, “ओह माय गॉड.”
taimur
एका सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्टनं हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे. व्हिडीओ शेअर हेअर स्टायलिस्टनं म्हटलं आहे की, “नवीन असिस्टंट… किंवा मग बॉस”

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर करीना कपूर लवकरच अंग्रेजी मीडियम सिनेमात काम करताना दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे करण जोहरचा तख्त सिनेमादेखील आहे. सैफबद्दल बोलायचं झालं तर तो बंटी और बबली 2 मध्ये दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी हे कलाकार दिसणार आहेत.