‘तांडव’मुळं निर्माण झालेल्या वादामुळं डायरेक्टर अली अब्बास जफर यांनी मागितली माफी ! म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सैफ अली खाान (Saif Ali Khan), डिंपल कपाडिया (Dimple Kapadia), तिग्मांशु धूलिया आणि सुनील ग्रोवर स्टारर तांडव (Tandav) या सीरिजचं पोस्टर 16 डिसेंबर रोजी रिलीज करण्यात आलं होतं. अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) हे या सीरिजचे डायरेक्टर आणि सहनिर्मातेही आहेत. त्यांनी आणि हिमांशु किशन मेहरा यांनी मिळून याची निर्मिती केली आहे. 9 एपिसोड असणारी ही सीरिज 15 जानेवारी 2021 रोजी (वार शुक्रवार) रिलीज झाली आहे. परंतु लगेचच सोशल मीडियावर याला विरोध होताना दिसत आहे. भगवान शंकराचा अपमान करत हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप या सीरिजवर होत आहे. यावरून आताा वाद सुरू झाला आहे जो काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अशातच आता डायरेक्टर अली अब्बास जफर यांनी यासाठी माफी मागितली आहे. त्यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे.

जफर यांनी ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी माफी मागितली आहे. त्यांनी त्यांचं स्टेटमेंट जारी केलं आहे. या सीरिजची पूर्ण स्टोरी ही काल्पनिक आहे आणि कोणत्याही घटनेसोबत त्याची तुलना म्हणजे योगयोग आहे असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी एक लांबलचक नोट लिहिली आहे.