बॉलीवुडच्या वाढल्या अडचणी ! आता तारा सुतारिया ‘कोरोना’ संक्रमित

मुंबई : बॉलीवुडमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढत चालली आहेत. आता अभिनेत्री तारा सुतारिया कोरोना संक्रमित झाल्याची बातमी आली आहे. मात्र, या बातमीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तारा सुनील शेट्टीचा मुलगा अहानसोबत ’तडप’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी आणि मनोज वाजपेयी नंतर आता तारा सुतारिया कोरोना संक्रमित होण्याची बातमी आली आहे.

ज्या प्रकारे बॉलीवुड सेलिब्रिटी लागोपाठ कोरोना पॉझिटिव्ह होत असल्याच्या बातम्या येत आहेत, यामुळे चिपटांच्या शूटिंग प्रभावित होणे स्वाभाविक आहे. अजूनपर्यंत तारा सुतारिया कोरोना पॉझिटिव्ह झाल्याच्या बातमीला दुजोरा मिळालेला नाही. अभिनेत्रीकडून ऑफिशियल कन्फर्मेशन मिळालेले नाही, परंतु मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, अभिनेत्री कोरोना व्हायरसने संक्रमित आहे.

तारा, सुनील शेट्टीचा मुलगा अहान सोबत ’तडप’ची शूटिंग करत होती. अशावेळी तडपच्या टीमवर सुद्धा कोरोनाच्या धोक्याचे सावट आहे. नुकतेच फिल्मच्या शूटिंगचे शेड्यूल कम्प्लीट झाले आहे. असे असताना तारा कोविड पॉझिटिव्ह झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. यापूर्वी रणबीर कपूर, संजय लीला भन्साळी, मनोज वाजपेयी सारख्या कलाकारांना सुद्धा या महामारीने गाठले आहे.