‘Heropanti 2’ मध्ये टायगर श्रॉफसोबत पुन्हा दिसणार तारा सुतारिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आजकाल बॉलिवूडमध्ये फ्रेंचायझी चित्रपट पाहायला मिळत आहेत. फ्रेंचायझी चित्रपटांमध्ये टायगर श्रॉफशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही. ‘हीरोपंती 2’ आणि ‘बागी 4’ या दोन सर्वाधिक पसंतीच्या फ्रँचायझीमध्ये दर्शकांना पुन्हा टायगर दिसणार आहे. ‘हीरोपंती 2’ मध्ये मुख्य अभिनेता टायगर श्रॉफच्या नावानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या मुख्य अभिनेत्रीबाबतही निर्णय घेतला आहे. या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री म्हणून निर्मात्यांनी तारा सुतारिया हीच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची बातमी आली आहे.

साजिद नाडियाडवालाच्या ‘हीरोपंती 2’ चित्रपटात ती टायगर श्रॉफसोबत दिसणार आहे. प्रॉडक्शन हाऊसकडून मिळालेल्या माहितीनुसार, साजिद नाडियाडवालाने अहान शेट्टीच्या डेब्यू चित्रपटात तारा सुतारियाचे काही सीन पाहिले होते आणि तिच्या शानदार अभिनयाने तिने त्यांचे मन जिंकले.

तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफ दोन वर्षानंतर पुन्हा एकदा स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. या वर्षाच्या सुरूवातीस निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी ‘हीरोपंती 2’ ची घोषणा केली होती आणि अ‍ॅक्शन फ्रेंचायझीच्या दुसर्‍या हप्त्यासह निर्माते साजिद नाडियाडवाला यांनी या फ्रँचायझीला स्केल, अ‍ॅक्शन आणि इतर सर्व बाबींच्या बाबतीत पुढच्या स्तरावर नेण्याचा विचार केला आहे.

‘हीरोपंती 2’ चे दिग्दर्शन अहमद खान करतील, ज्यांनी बागी -2 आणि बागी -3 चे दिग्दर्शन केले आहे. बॉक्स ऑफिसवर ‘हीरोपंती 1’ हिट गाजली होती, यामध्ये टायगरची कामगिरी चित्रपटाचे मुख्य आकर्षण ठरली आहे. तारा आणि टायगरची केमिस्ट्रीदेखील चाहत्यांना चांगलीच पसंत पडली आहे आणि आता हाय ऑक्टेन अ‍ॅक्शन आणि साजिद नाडियाडवाला यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हीरोपंती 2’ नक्कीच नवीन रेकॉर्ड करेल.

You might also like