Tejas First Look : सर्वांची मनं जिंकेल कंगना रनौतचा ‘फायटर’ पायलट ‘लुक’

मुंबई : पोलीसनामाम ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं आपला आगामी सिनेमा तेजसचा फर्स्ट लुक रिलीज केला आहे. या फोटोत कंगना इंडियन एअरफोर्स पायलटच्या वेशात दिसत आहे. तिच्या मागे एक फायटर प्लेनही दिसत आहे. एका धाडसी फायटर पायलटची स्टोरी या सिनेमता पहायला मिळणार आहे. इंडियन एअरफोर्सनं 2016 मध्ये महिलांना कॉम्बॅट सर्व्हीसेसमध्ये भरती करून घ्यायला सुरुवात केली होती. तेजस अशाच एका धाडसी महिला पायलचटी स्टोरी सांगत आहे.

आपल्या नवीन सिनेमाबद्दल बोलताना कंगना म्हणाली, “वर्दीतील महिला अधिकाऱ्याच्या बलिदानावर आपल्या देशात जास्त लक्ष दिलं जात नाही. तेजसमध्ये मला अशीच एक फीमेल एअरफोर्स पायलट बनण्याची संधी मिळत आहे. जिच्यासाठी स्वत:च्या आधी देश महत्त्वाचा आहे. या सिनेमातून आजच्या तरुणांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण होईल आणि त्यांना गर्व वाटेल अशी आशा करते. या सिनेमासाठी मी खूप उत्साहित आहे.”

हा सिनेमा पुढील वर्षी एप्रिल महिन्यात रिलीज केला जाईल. सर्वेश मेवाडा या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. त्यांनीच सिनेमाची स्टोरी लिहिली आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर अलीकडेच ती पंगा सिनेमात दिसली होती. सिनेमानं ठिकठाक कमाई केली. सध्या ती आपला आगामी सिनेम थलायवा ची तयारी करत आहे. यात ती तमिळनाडूच्या राजकारणातील एक मोठं नाव दिवंगत जयललिता यांची भूमिका साकारणार आहे.

 

You might also like