Sravani Death : TV अभिनेत्री श्रावणीनं केली आत्महत्या, सोशल मीडियावर चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सन 2020 हे सगळ्यांसाठी वाईट वर्ष ठरले आहे. यावर्षी बर्‍याच स्टार्सनी जगाला निरोप दिला आहे. यामध्ये काहींचे आयुष्य आजाराने हिसकावून घेतले तर काही जणांनी स्वत: चे आयुष्य संपविले. 9 सप्टेंबरला अभिनेत्री श्रावणीच्या आत्महत्येची अचानक बातमी येताच तेलगू टीव्ही जगतात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे आदल्या दिवशी म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी दक्षिण भारतीय सिनेमा अभिनेते जयप्रकाश रेड्डी यांचेही निधन झाले.

श्रावणीच्या आत्महत्येचे कारण सध्या कळू शकलेले नाही. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, देवराज रेड्डी यांनी छळ केल्यामुळे श्रावणीने आत्महत्या केल्याचा आरोप दिवंगत अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी केला. असे म्हटले जात आहे की, देवराजने श्रावणीला त्रास दिला ज्यामुळे तिने हे पाऊल उचलले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास अभिनेत्रीने आत्महत्या केली. ती हैदराबादच्या एस्सार नगरच्या पीएस मथुरा नगरातील एच 56 ब्लॉकच्या दुसऱ्या मजल्यावर राहत होती. मृतदेह पोस्टमार्टमसाठी उस्मानिया रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी देवराज रेड्डीविरूद्ध एप्सरनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यासोबतच श्रावणीचा भाऊ आरोपींना कठोर शिक्षा देण्याविषयी बोलला आहे.

विशेष म्हणजे गेल्या आठ वर्षांपासून श्रावणी तेलुगू कार्यक्रमात काम करत होती. श्रावणीच्या हिट लिस्टमध्ये ‘मौनरागम’ आणि ‘मनसू ममता’ सारख्या अनेक मालिकांचा समावेश आहे. श्रावणी सध्या ‘मानसू ममता’ या मालिकेत दिसली होती. श्रावणीच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहते अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहत आहेत.