Video : नोरा फतेहीनं Instagram वर पार केला 20 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा ! चाहत्यांचे मानले आभार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार नोरा फतेही (Nora Fatehi) आपल्या डान्ससाठी खूपच फेमस आहे. नोरा अनेकदा तिचे डान्स व्हिडिओ सोशलवरून शेअर करत असते. जे व्हायरल होताना दिसत असतात. याशिवाय आपल्या बोल्ड फोटोंमुळं आणि व्हिडिओंमुळंही नोरा चर्चेत येत असते. सध्या नोरा सोशलवर चर्चेत आली आहे, कारण तिनं 20 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पार केला आहे.

नोरानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. यात नोरा खूपच आकर्षक आणि सुंदर दिसत आहे. नोरा व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. नोराचा लुक खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. नोरानं याचा एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे.

नोरानं हे फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. इंस्टाग्रामवर (Instagram) तिनं 20 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पार केला आहे. नोरा आपल्या डान्स, फोटो आणि व्हिडिओ तसेच बोल्ड अवतारांमुळं चाहत्यांना आकर्षित करत असते.

सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे.

नोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोालायचं झालं तर लवकरच नोरा अजय देवगण स्टारर भुज द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती स्ट्रीट डान्सर थ्री डी सिनेमात दिसली होती. नोरानं बॉलिवूडमध्ये अनेक आयटम नंबर केले आहेत. साकी साकी, दिलबर, एक तो कम जिंदगानी, कमरिया, गरमी हे तिचे आयटम साँग खूपच गाजले आहेत. नोरा आपल्या डान्ससाठी विशेष ओळखली जाते. रोअर : टायगर्स ऑफ द सुंदरबन्स या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. याशिवाय क्रेझी कुक्कड फॅमिली या सिनेमातही तिनं काम केलं आहे. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर खास काही चालले नाहीत.

 

You might also like