Trailer : उद्या रिलीज होणार ‘हे’ 3 सिनेमे आणि 2 वेब सीरिज ! आजच पाहा यादी

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोनामुळं सिनेमा हॉल बंद असल्यानं अनेक सिनेमे हे ओटीटीवर रिलीज होताना दिसले. अनेक नवीन वेब सीरिजदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. लोकांचं घरात बसून मनोरंजन होत आहे. उद्या (शुक्रवार, दि. 4 डिसेंबर 2020) 3 सिनेमे आणि 2 वेब सीरिज रिलीज होणार आहेत. आज याचबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) सन्स ऑफ द सॉयल – प्रो कबड्डी लीगची टीम जयपूर पिंक पँथर्सच्या जर्नीवर आधारित वेब सीरिज अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर 4 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. सन्स ऑफ द सॉयल असं या सीरिजचं नाव आहे. अभिषेक बच्चनची ही टीम आहे.

2) भाग बीनी भाग – स्वरा भास्करची मोस्ट अवेटेड वेब सीरिज भाग बीनी भाग नेटफ्लिक्सवर 4 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

3) दरबान – रवींद्रनाथ टागोर यांच्या स्टोरीवर आधारित सिनेमा दरबान 4 डिसेंबर रोजी झी 5 वर रिलीज होणार आहे. या सिनेमात शरद केळकर, रसिका दुग्गल, शारिब हाश्मी प्रमुख भूमिकेत आहेत.

4) बॉम्बे रोज – नेटफ्लिक्सवरील पहिला भारतीय अ‍ॅनिमेटेड सिनेमा बॉम्बे रोज 4 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

5) मंक – मंक सिनेमा 4 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. हा अमेरिकन ड्रामा सिनेमा आहे.

 

You might also like