Photos : दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्तीच्या सुनेचा ‘सुपरहॉट’ अवतार ! बिकिनी लुकचा सोशलवर ‘राडा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांची सून मदालसा शर्मा (Madalasa Sarma) हिनं हिंदीपेक्षा साऊथ सिनेमात जास्त काम केलं आहे. मदालसा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. ती चाहत्यांसाठी कायमच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. पुन्हा एकदा मदालसा चर्चेत आली आहे. याचं कारण आहे तिचा हॉट आणि बोल्ड अवतार.

मदालसानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. या मदालसानं तिचा हॉट अवतार दाखवला आहे. काही फोटोत ती शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे, तर काही फोटोत ती बिकिनी आणि ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिसत आहे.

मदालसचा हा बोल्ड अवतार चाहत्यानांही खूप आवडला आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी कमेंट करत तिच्या ब्यूटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

मदालसाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर सध्या ती टीव्ही शोमध्ये आपला जलवा दाखवत आहे. स्टार प्लसवरील अनुपमा या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारत आहे. यात तिचा निगेटिव्ह रोल आहे. चाहत्यांना तिची भूमिका खूप आवडली आहे. तिनं हिंदीपेक्षा साऊथ सिनेमात जास्त काम केलं आहे.

https://www.instagram.com/p/ByKUV9mpmNp/