आता ऋतिक रोशननं चढविला कंगना रनौतवर ‘शाब्दिक’ हल्‍ला, लावले ‘हे’ गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री कंगना रणौतच्या बाबतीत अभिनेता हृतिक रोशन नेहमीच गप्प असतो. पण अलीकडेच एका मिडिया समिटमध्ये त्याने कंगना रणौतशी संबंधित वादावरही प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तपत्राच्या लीडरशिप समिटमध्ये जेव्हा हृतिकला कंगनाच्या वादावर चर्चा करण्यास सांगण्यात आले तेव्हा हृतिक नाव न घेता म्हणाला, मला वाईट वाटले की, जी व्यक्ती (कंगना) खोटे बोलणे व फसवणूक करण्यासाठी गुंतली होती त्या व्यक्तीकडे मिडियाने लक्ष दिले.

हृतिक कंगनाबद्दल क्वचितच बोलतो. त्याचबरोबर कंगना चित्रपटाची जाहिरात असो किंवा कोणतीही मुलाखत हृतिकबद्दल बोलायचे कधीही टाळत नाही. कंगनाशिवाय हृतिकने आपल्या ‘सुपर 30’ या चित्रपटाच्या यशाबद्दलही चर्चा केली. हृतिक म्हणाला, मी एक मजबूत पात्र निवडले होते. यासाठी मी खूप कष्ट केले. याबद्दल मला समाधानाची भावना आहे.

लवकरच हृतिक ‘वॉर’ नावाच्या अ‍ॅक्शन फिल्ममध्ये दिसणार आहे. या चित्रपटात हृतिकसोबत टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत आहे. टायगर आपला बॉलीवूडचा सुपरहिरो ‘क्रिश’ म्हणजेच हृतिकला प्रेरणास्थान मानतो. प्रथमच दोघे एकत्र काम करत आहेत. सिद्धार्थ आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट 2 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री दिशा पाटनी देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. आता ती हृतिकसोबत आहे की टायगरसोबत ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.