अभिनेत्री होण्याआधी ‘झाडू-पोछा’ करायच्या शशिकला ! ‘लेडी व्हिलन’ म्हणून झाल्या फेमस ! ‘असं’ बदललं नशीब

हिंदी सिनेमात व्हिलनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री शशिकला (Shashikala) यांचं जीवन खूप संघर्षमय राहिलं आहे. अवघ्या 5 वर्षांच्या असताना त्यांनी डान्स सुरू केला होता. कुटंबातील वादामुळं त्यांचं नशीब पालटलं. शशिकला यांच्या वडिलांनी त्यांच्या लहान भावाला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं होतं. यासाठी त्यांच्या वडिलांनी खूप पैसे खर्च केले. वडिला सांगायचे की, जेव्हा मुलगा परत येईल तेव्हा पूर्ण कुटुंबाला सांभाळेल. परंतु जेव्हा तो आला तेव्हा त्यानं जबाबदारी घेण्यास नकार दिला.

नूरजहाँ यांची शशिकला यांच्यावर नजर गेली, अन् नशीब पलटलं

यानंतर त्यांच्या वडिलांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांची आर्थिक स्थिती तशीच होती. घर चालवण्यासाठी शशिकला यांनी काम करण्याचा निर्णय घेतला. त्या लोकांच्या घरी कामासाठी जाऊ लागल्या. घरात मोलकरणीचं काम करतानाच त्यांचं नशीब बदललं. नूरजहाँ यांची शशिकला यांच्यावर नजर गेली. त्यांनी पतीकडे मागणी केली की, या मुलीला त्यांच्या लहानपणीच्या रोलसाठी कास्ट करावं. त्यांना असं वाटत होतं की, शशिकला यांचा चेहरा त्यांच्याशी मिळता जुळता आहे.

पहिल्या सिनेमासाठी मिळालं होतं एवढं मानधन

अशा प्रकारे शशिकला यांना 1945 मध्ये पहिल्यांदा जीनम सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. पहिल्या सिनेमासाठी त्यांना 25 रुपये मिळाले होते. हळू हळू शशिकला यांना प्रसिद्धी मिळाली. सिनेमात त्याना निगेटीव्ह रोल मिळू लागले. अनेक सिनेमात त्यांनी क्रूर सासूची भूमिका साकारली. आजवर त्यांनी साकारलेल्या भूमिकांचं खूप कौतुकही झालं.

अशी होती खासगी लाईफ

शशिकला यांच्या खासगी आयुष्यात खूप चढऊतार पाहायला मिळाले. ओमप्रकाश सहगल यांच्या सोबत त्यांनी लव्ह मॅरेज केलं. परंतु हे लग्न जास्त दिवस टिकलं नाही. शशिकला परदेशात गेल्या आणि दीर्घकाळानं परत आल्या व कोलकात्याला गेल्या. त्या इथं 9 वर्षांपर्यंत मदर टेरेसा सोबत राहिल्या. यानंतर त्यांनी पुन्हा बादशाह सिनेमात काम करत वापसी केली होती.

शशिकला यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर आपल्या करिअरमध्ये त्यांनी 100 हून अधिक सिनेमात काम केलं आहे. यापैकी त्यांच्या रॉकी, तीन बहुरानियां, अनुपमा, वक्त अशा काही सिनेमांची खूप स्तुती झाली. खासगी आयुष्यात अनेक चढऊतार आल्यानंतर त्यांनी काहीसा ब्रेकही घेतला. यानंतर त्यांनी बादशाह या सिनेमातून पुन्हा वापसी केली. 1962 साली आरती सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला आहे.