Tiger 3 : सलमान खान आणि कतरिना कैफ पुन्हा एकदा करणार मोठा धमाका, समोर आली तारीख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमध्ये सध्या अनेक मोठ्या चित्रपटांबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. बर्‍याच चित्रपटांचे शूटींग चालू आहे आणि बर्‍याच जणांच्या रिलीजच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. दरम्यान, सलमान खान आणि कतरिना कैफच्या चाहत्यांसाठी देखील आनंदाची बातमी आली आहे. अलीकडेच या जोडीच्या सुपरहिट फ्रेंचायझीच्या तिसर्‍या चित्रपटाच्या तयारीचा तपशील समोर आला आहे. तो म्हणजे ‘टायगर 3’. ज्यासाठी चाहते दीर्घ काळापासून प्रतीक्षा करत होते, ही बातमी अशी आहे की आता चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. याा चित्रपटाच्या तारखांबाबतही मीडिया रिपोर्टमध्ये माहीती दिली जात आहे.

‘टायगर 3’ हा सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा सोबतचा नववा चित्रपट असेल. माहितीनुसार या चित्रपटाचे काम सुरू झाले असून त्याची शूटिंगची तारीखही समोर आली आहे. या अहवालानुसार सलमान-कतरिना मार्च 2021 पासून ‘टायगर 3’ च्या शुटिंगला सुरुवात करणार आहेत. यासोबतच या चित्रपटाच्या पहिल्या शेड्यूलचे शुटिंग मुंबईतच होणार असल्याचेही सांगितले जात आहे. यानंतर त्याचे उर्वरित शूटिंग मध्यपूर्वेत केले जाईल. एवढेच नाही तर शाहरुख खान देखील या चित्रपटात दिसणार आहे.

टायगर फ्रॅंचायझीचा हा चित्रपट खूप मोठ्या बजेटवर तयार होईल, असेही सांगितले जात आहे, हे बजेट मागील सर्व चित्रपटांपेक्षा खूप जास्त असेल. दरम्यान, या चित्रपटाचे टायटल तेच ठेवले जाईल की नाही, याबाबत विचार सुरू आहे. या चित्रपटाचे नाव देखील बदलले जाऊ शकते. आत्ता कतरिना तिच्या आउटफिटचे ट्रायल घेत आहे. यश राज चित्रपटाकडून या चित्रपटाच्या खलनायकासाठी नवा चेहरा मागितला जात आहे. दरम्यान या चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास जफरदेखील कॅटरिना कैफबरोबर दुसर्‍या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात कतरिना कैफ एका सुपरवुमनच्या भूमिकेत दिसणार आहे.