Video : मुलीच्या डान्सवर Impress झाला टायगर श्रॉफ, म्हणाला- ‘हृतिकपेक्षा चांगली डान्सर’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  सोशल मीडियावर एका युजरनं त्याच्या 18 महिन्यांच्या पुतणीचा डान्स व्हिडीओ शेअर केला ज्यात ती पुतणी वॉर सिनेमातील जय जय शिवशंकर या गाण्यावर डान्स करत होती. या युजरनं टायगर श्रॉफ आणि हृतिकला टॅग करत लहिलं की, प्रिय हृतिक आणि टायगर तुम्हाला कडक टक्कर. माझी 18 महिन्यांची पुतणी डान्स करत आहे. तुम्ही पाहायला हवं.”

टायगर श्रॉफनं यावर ट्विट तर उत्तरही दिलं. टायगरनं लिहिलं की, मुलगी हृतिक आणि त्याच्या पेक्षा जास्त चांगली डान्सर आहे. टायगर असंही म्हणाली, काहीच स्पर्धा नाही कारण हिनं ती जिंकली आहे.

सध्या या लहान मुलीचा डान्स सोशलवर खूप व्हायरल होत आहे. युजरला टायगरनं रिप्लाय केल्यानं त्यालाही खूप आनंद झाला आहे. टायगरच्या या ट्विटनंही साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. टायगरचं हे ट्विटही खूप व्हायरल होत आहे. याआधीही एका लहान मुलाच्या डान्सला टायगरनं उत्तर दिलं होतं.

टायगरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो बागी 3 मध्ये दिसला आहे. टायगर हॉलिवूड सिनेमा रैम्बोच्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे. टायगर 2014 साली आलेल्या हिरोपंती या सिनेमाच्या सिक्वलमध्ये म्हणजेच हिरोपंती 2 मध्येदेखील काम करताना दिसणार आहे.