टायगर श्रॉफची बहिण कृष्णा लुक्समुळं झाली ट्रोल ! एकाच उत्तरानं केली बोलती बंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) ची मुलगी आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) ची बहिण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) आपल्या बोल्ड लुकमुळे नेहमीच चर्चेत असते. कुटुंबात वडिल आणि भाऊ ॲक्टर असूनही कृष्णा सिल्वहर स्क्रिनपासून दूर आहे. असं असली तरी सोशल मीडियावर मात्र ती नेहमीच ॲक्टीव आणि चर्चेत असते. सोशलवरील तिची फॅन फॉलोविंग एखाद्या स्टारपेक्षा कमी नाही. तिचा बॉयफ्रेंड इबान हॅम्स (Eban Hyams) याच्यासोबत ती अनेकदा रोमँटीक फोटो शेअर असते ज्यामुळं ती कायम चर्चेचा हिस्सा बनत असते. अलीकडेच कृष्णानं तिच्या लव्ह लाईफबद्दल मोठा गौप्यस्फोट केला होता. इबान आणि तिचं ब्रेकअप झाल्याचं तिनं सांगितलं होतं. कृ्ष्णानं नुकतेच काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले ज्यानंतर ती ट्रोल झाली होती. परंतु तिनं ट्रोलरला जशास तसं उत्तरही दिलं आहे.

अलीकडेच कृष्णानं तिच्या इंस्टावरून काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. यावेळी तिचा चेहरा आणि लिप्स काही वेगळेच दिसून आले. यानंतर तिला ट्रोल केलं जाऊ लागलं. यावेळी एकानं तिला सवालही केला. कृष्णानंही ट्रोलरचा जोरदार उत्तर दिलं. तिनं याचा स्क्रीनशॉटही इंस्टा स्टोरीला शेअर केला आहे.

ट्रोलरनं कृष्णाला विचारलं की, तिनं चेहऱ्यासोबत काही केलं आहे का. कारण तो नेहमीपेक्षा थोडा वेगळा दिसत आहे.

ट्रोलरला उत्तर देताना कृष्णा म्हणाली की, मित्रा सर्वांना असं वाटत आहे की, मी प्लास्टीक सर्जरी द्वारे काही केलं आहे. परंतु हा मेकअप आहे. याला लिप्स ओव्हरलाईंग म्हणतात. तुम्ही अशा महिलांसोबत राहता जी रात्री काही और आणि सकाळी उठल्यानंतर काही और दिसते. यावर ट्रोलरनं रिप्लाय करत लिहलं की, वाह काय उत्तर आहे. खूप चांगलं केलंस.

You might also like